आदिवासी पारधी समाज्यावर दिवसें-दिवस आत्याचारामध्ये वाढ
प्रतिनिधी- आनंद काळे
बारामती- महाराष्ट्र राज्यातील आदिवासी पारधी समाज्यावर सातत्याने आत्याचारामध्ये वाढ होताना दिसत आहे.असाच काही प्रकार इंदापूर तालुक्यातील लासुरणें गावामध्ये घडला.सौ आशा खालील काळे वय -35 वर्ष ह्यांच्या घरासमोर असलेली झाडे काही गावातील इसमाने तोडण्यास सुरवात केली असता त्यांना सौ आशा काळेनीविरोध केला त्यावेळी 4 व्यक्तीनी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली.सदर महिलेचे अंगावरील कपडे फाडले व मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी आशा काळेची पती खलील काळे,सासू बडी भागवत काळे हे भांडणे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनासुद्धा गंभीर स्वरूपात मारहाण केली.आशा काळे ह्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रसुद्धा तोडून नेले.
वालचंदनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असता ठाणे अंमलदार ह्यांनी आरोपींना सहजता निर्माण होईल असाच गुन्हा नोंद केला.त्यामुळे आशा काळे हिने संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्या आरोपीवर कठोरपणे कारवाई करण्यासाठी निवेदन मा ना अनिलजी देशमुख गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठवले आहे.
निवेदनात 1) बापू भगवान लोंढे 2)श्रीपती चव्हाण 3) विनोद लोंढे 4) अनोळखी व्यक्ती ह्यांचावर कायदेशीर कडक कारवाई करून त्या गुन्ह्यात 379 वाढ करून त्यावरील आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावे या आशयाचे निवेदन भटकया विमुक जमाती संघटनेचे प्रदेश सचिव श्री आंनद काळे यांनी विविध मान्यवरांना पाठविल्या आहेत.निवेदनावर अखिल भारतीय सम्राट सेना(पारधी आघाडी) प्रदेश अध्यक्ष श्री बापूराव काळे,आकाश भोसले,सागर काळे ,नियोजन भोसले, अभिजित काळे भगवान भोसले,लखन काळे,नितीन शिंदे आदी कार्यकर्त्यांच्या सहीने पाठविले आहेत.






