Maharashtra

भाजपच्या स्थापना दिनी स्वर्गीय उदय वाघांच्या आठवणीने कार्यकर्ते भावुक

प्रतिनिधी नूरखान

भाजपच्या स्थापना दिनी स्वर्गीय उदय वाघांच्या आठवणीने कार्यकर्ते भावुक

आज भाजपा स्थापना दिनानिमित्त आमदार स्मिताताई वाघ यांनी कुटूंबा समवेत घरी ध्वजारोहन केले, यावेळी भाजपाचे संस्थापक शामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, सरचिटणीस राकेश पाटील, विजय राजपूत, राजेश वाघ, चंद्रकांत कंखरे, राहुल चौधरी, रावसाहेब पाटील, सौरभ पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या स्थापना दिनी स्वर्गीय उदय वाघांच्या आठवणीने कार्यकर्ते भावुक

यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनी या दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील व तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी अनेक कार्यकर्ते बोलताना भावनाविवश झालेले पाहायला मिळाले,ज्यांनी आम्हाला भाजपाशी जोडले त्याग पक्षनिष्ठा आमच्यात रोवली, असे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष स्व.उदय वाघ यांच्या आठवणींना यानिमित्ताने त्यांनी आमदार स्मिताताई जवळ उजाळा दिला.

चौकट विद्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे आणि भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील नेवे यांना, आजच्या दिवशी पक्ष कार्यात स्वर्गीय उदय वाघ यांनी दिलेल्या योगदानाची आठवण झाल्याने, जावळे व नेवे यांनी आमदार स्मिताताईंशी संवाद साधत आपले मन मोकळे केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button