Amalner

Amalner: श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान आयोजित ( कावड यात्रा ) उत्साहात संपन्न…

Amalner: श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान आयोजित ( कावड यात्रा ) उत्साहात संपन्न…

अमळनेर कावड यात्रेतील शिवभक्तांनी तापी माईवर जाऊन मनसोक्त पोहण्याच्या आनंद घेतला. एखाद्या पर्यटन स्थळावर येण्याच्या अनुभव शिवभक्तांनी घेतला. विधिवत पूजा करून कावडीत तापी मातेचे जल घेऊन कावड यात्रेस सुरुवात झाली. 2013 पासून श्री.वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान तर्फे कावड यात्रा सुरू करण्यात आली. सुरुवातीस आठ शिवभक्तांनी सुरू केलेल्या कावड यात्रेत आता शेकडोंनी शिवभक्त उत्साहाने सामील होतात. डीजेच्या तालावर नाचत गात शिवभक्त मार्गस्थ झाले. जळोद येथे सरपंच मुन्ना उर्फ शशिकांत साळुंखे. अनिल तुळशीराम पाटील. विलास पंढरीनाथ देशमुख. ज्ञानेश्वर पांडुरंग चौधरी. बापूजी कोळी. रघुनाथ दामू चौधरी या ग्रामस्थांनी शिवभक्तांचे स्वागत केले. तो स्वादिष्ट असा नाश्त्याच्या प्रसाद दिला. शिवभक्त नाचत गात अमळगाव येथे पोहोचले तेथील ग्रामस्थ प्रवीण काशिनाथ चौधरी. निखिल शेखर पाटील. वसंत वल्लभ मोरे. नितीन अर्जुन चौधरी. दीपक संभाजी भोसले. डॉ.पंकज सुरेश चौधरी, संजय चौधरी. यांनी उत्साहात स्वागत करू सर्व शिवभक्तांना स्वादिष्ट असे भोजन दिले. शिवभक्त फारच आनंदात कावड घेऊन नाचत होते. कावड घेऊन नाचल्याने श्री महादेव प्रसन्न होतात असे म्हटले जाते. गांधली येथे शिवभक्त पोचल्यावर ग्रामस्थ श्री सुधाकर आबा साळुंखे श्री गजेंद्र दत्तात्रय साळुंखे श्री गुंजन सुधाकर साळुंखे श्री रोहिदास खंडू पाटील श्री ज्ञानेश्वर सुखदेव पाटील श्री दिवाण यशवंत पाटील सर्वांनी शिवभक्ताचे स्वागत करून चहा पाण्याची व्यवस्था केली. सप्तशृंगी माता मंदिरावर गोरख पारधी यांनी शिवभक्तांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. कावड यात्रा दरम्यान जळोद ते अमळनेर रस्त्यावर अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेटी दिल्या व शिवभक्तांचे स्वागत केले. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्रीताई पाटील. श्री कुमावत . हरियाणातील ट्रान्सपोर्ट वाले श्री अनिल पुनिया. किरण पारधी. श्री निंबा दला चौधरी पिंपळे पक्षी मित्र श्री सुनील भोई. एसटी महामंडळाचे बापू चौधरी. नगरसेवक नरेंद्र चौधरी. लक्ष्मी जिनिंग चे संचालक श्री चंद्रकांत उर्फ पिंटू चौधरी. श्री मोजी भाई श्री सूर्यकांत पाटील श्री प्रफुल पवार. प्राध्यापक श्री भरत परदेशी श्री संजय लांडगे पाडळसे धरण समितीचे श्री रवींद्र पाटील. श्री विशाल पाटील. श्री देविदास. देसले. श्री योगेश पाटील. माजी नगरसेवक श्री बाळा पवार. श्री नरेंद्र चौधरी, श्री महेश पाटील. श्री लोटन पाटील. श्री बंडू नाना. श्री विशाल पाटील श्री पंकज चौधरी व त्यांचे कार्यकर्ते. पत्रकार या सर्वांनी येऊन शिवभक्तांचे व महादेवाचे आशीर्वाद घेतले. राजे संभाजी मित्र मंडळ व शिवशक्ती मित्र मंडळ येथील युवा कार्यकर्त्यांनी महादेवाचे पिंडीची बनवलेली कावड यात्रा फारच आकर्षक ठरली. त्या कावड यात्रेचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या बाजू मधील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पारंपारिक वेशभूषेत नाचत गात शिवभक्त श्री वर्णेश्वर मंदिर परिसरात पोहोचले व तापी माईचा जल पूजनाने अभिषेक करण्यात आला. साने नगर येथील शिवभक्तांनी सिद्धेश्वर मंदिरावर व राजोरे येथील शिवभक्तांनी श्री हरेश्वर महादेव मंदिरावर अभिषेक केला. शहरांमध्ये अनेक शिवभक्तांनी कावड यात्रेच्या स्वागताचे बोर्ड लावलेले होते. कावड यात्रा यशस्वी करण्यासाठी पिंपळनेर येथील शिवभक्त सुभाष पाटील श्री वाडीले आप्पा श्री संजय शुक्ल श्री नरेंद्र पाटील. श्री नाना पाटील. श्री जगदीश पाटील. भास्कर पाटील. श्री कैलास श्रावण श्री.नाना धनजी. श्री छोटू बोरसे. श्री ज्ञानेश्वर काळे, सुशील भोईटे, श्री.वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थांनचे अध्यक्ष सुभाष चौधरी या सर्वांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button