Paranda

पद्मावती माहिला बचत गटाच्या वतीने मास्क -सेनिटायझर पोलिसांना वाटप

पद्मावती माहिला बचत गटाच्या वतीने मास्क -सेनिटायझर पोलिसांना वाटप

कोरोनाचा सामना करण्या साठी महिला बचत गटाच पुढाकार

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे ( दि १२ )

कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी आपल्या जिवाची पर्वा न करता पोलीस प्रशासन दिवस रात्र देश सेवा करत आहेत या पोलिस बांधवासाठी परंडा येथिल महिला बचत गटाने पुढाकार घेतला आहे .

परंडा येथील पद्मावती महिला बचत गटाच्या वतीने पोलिसांना बचत गटाने तयार केलेले मास्क व सेनिटायझरचे वाटप रविवार दिनांक १२ रोजी पोलीस ठाणे परंडा येथे करण्यात आले.

यावेळी परंडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद , कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबराव राठोड , पोलीस कर्मचारी जगताप मामा , पोलीस कर्मचारी खरात, बचत गटाच्या आध्यक्ष जोस्ना बेदमुथा, सचिव सोनाली देसाई, दीपाली देसाई, पायल शहा ,रागिनी शहा ,ज्योती मेहता ,सपना परांडकर ,वनिता शहा ,अश्विनी मुसळे, भाग्यश्री कदम आदी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button