कोविड सेंटरमध्ये रुग्णाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतांना डॉक्टरांना शिवीगाळ
यावलला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे काळ्या फिती लावून कामकाज
रजनीकांत पाटील
यावल प्रतिनिधी ::> तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये सोमवारी गावातील एका व्यक्तीने रुग्णाला पुढील उपचारासाठी हलवल्याचा राग आल्याने शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या प्रकाराचा बुधवारी यावल रुग्णालयात काळ्या फिती लावुन तीव्र निषेध करण्यात आला. तसेच तहसीलदारांना निवेदन दिले.
या व्यक्तीचा रुग्णाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तरी त्याने आपल्या पदाचा, ओळखीचा, स्थानिक असल्याचा गैरवापर करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता बिघडवली. हा गोंधळ रात्री पोलिसांनी हस्तक्षेप करून मिटवला. मात्र अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी अशा मागणीचे निवेदन येथील तहसिल कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांना दिले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, डॉ. बी. बी. बारेला, डॉ. अभिजीत सरोदे, बीडीओ डॉ. नीलेश पाटील आदींनी दिले. तर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या प्रकाराचा निषेध व कामकाज केले.






