Paranda

हिंदुहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै.जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने २० व्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळा

हिंदुहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै.जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने २० व्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळा

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा (सा.वा)

हिंदुहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै.जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने २० व्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळा रविवार दिनांक १६फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १:३०मिनिटांनी संपन्न होणारा असून वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

हिंदुहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै.जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने २० व्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळा

सामुदायिक विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सिनेस्टार ,कलाकार ची हजेरी पाहता येणार आहे .त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे या विवाह सोहळ्यामध्ये १२१ वर वधु विवाह बंधनात अडकणार आहेत. मराठी सिनेमा कलाकार सिद्धार्थ जाधव मितवा मराठी चित्रपट अभिनेत्री प्रार्थना बेहरे ,लागिर झालं झी मराठी मालिका अभिनेता किरण गायकवाड स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाई ची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. विवाह सोहळ्यासाठी भैरवनाथ कारखाना वर भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला असून वधू-वरांच्या शामीयाना ची खास व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्यात वधु-वरांसाठी कपडे ,मणी-मंगळसूत्र ,आणी संसारोपयोगी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणार आहे.कारखाना स्थळी दक्षिण बाजूला तिन लाख वऱ्हाडी मंडळीची जेवनाची व्यवस्था पुरुषासाठी वेगळी , स्त्रियासाठी वेगळी अशी करण्यात आली आहे.

हिंदुहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै.जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने २० व्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळा

यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने व त्यासोबत राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर हेलिकैफ्टरने येणार असल्याने हेलिपॅड ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. वराडी मंडळीच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सामुदायिक विवाह सोहळ्यात मध्ये जलसंधारणमंत्री आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे द्वितीय सुपुत्र ऋषीराज सावंत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत यांचे सुपुत्र ऋतुराज सावंत यांचा देखील विवाह होणार आहे. यामुळे सामुदायिक विवाह सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हिंदुहदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंतर्गत कै.जयवंतराव सावंत प्रतिष्ठान च्या वतीने २० व्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळा

जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः हजर राहणार असल्याने पोलीस उपाधीक्षक पालवे पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे व त्यांच्या पथकाने भैरवनाथ साखर कारखाना सोहळ्याची पाहणी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button