kalamb

? Big Breaking..कळंब शहरातील ‘त्या’ महिलेवर तलवारीने हल्ला करणारा गजाआड

कळंब शहरातील ‘त्या’ महिलेवर तलवारीने हल्ला करणारा गजाआड

प्रतिनिधी-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील बाबा नगर परिसरातील काल दिनांक 20/6/2020सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एका महिलेवर प्रदीप दिनकर खेपकर नामक व्यक्तिने तलवारीने हल्ला केला होता.

सदरील महिलेस काही युवकांनी कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे सदर महिलेने दिलेल्या जबाबनुसार प्रदिप खेपकर हा गेल्या4- 5 वर्षांपासून त्रास देत होता आणि काल त्याने सदरील महिलेस तू मला का बोलत नाही असे म्हणत तलवारीने हल्ला करून पळ काढला होता.

तर हल्लेखोर घटनास्थळी हुन फरार झाला होता .याघटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस यांनी घटनास्थळी भेट देत अवघ्या काही वेळातच पलायन करण्याचा प्रयत्नात असलेल्या त्याच्या कळंब शहरातील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

जखमी महिलेच्या जवाबनुसार त्याच्यावर कळंब पोलिस ठाण्यात कलम 307,504,506 भादंविसह4,24भा.ह.कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button