Pune

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६१ किलो मातीतून सागरचे मारकडचे सुवर्ण पदक.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६१ किलो मातीतून सागरचे मारकडचे सुवर्ण पदक.

दत्ता पारेकर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या गादी व मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सध्या पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु आहे. आज दुसऱ्या सत्रात ६१ किलो माती विभागच्या उपांत्य व अंतिम फेरीच्या लढती झाल्या. त्यात पुण्याच्या जिल्हाच्या सागर मारकड याने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.सागरने अंतिम लढतीत त्याने पुण्याच्या निखिल जितकर याला चितपट करत सुवर्ण पदका वरती कब्जा केला.
मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे सराव करणारा सागर मारकड याने यापूर्वी देखील झालेल्या अधिवेशनात सोनेरी कामगिरी केले होती. चालु वर्षी सागरने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मिळवलेलं त्याचे वैयक्तिक पाचवे सुवर्ण पदक आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button