Nashik

द्राक्ष निर्यात अनुदानासाठी केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांचेकडे मागणी :खा: डॉ भारती पवार

द्राक्ष निर्यात अनुदानासाठी केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांचेकडे मागणी :खा: डॉ भारती पवार

नाशिक : भारत हा कृषिप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था ही कृषी उत्पादनावरच अवलंबून आहे. भारतातील अनेक कृषी उत्पादने ही परदेशात निर्यात होतात .भारतात पिकणाऱ्या गुणवत्तापूर्ण शेतमालास परदेशात मोठी मागणी आहे . त्यातच नासिक जिल्ह्यातील द्राक्षपीक हे प्रमुख पीक आहे .नासिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतले जात असल्याने संपूर्ण युरोपात तथा अन्य देशात नासिक चे द्राक्षे निर्यात होतात. चवीला अतिशय मधुर असल्याने त्याची प्रतवारीही अतिशय दर्जेदार पद्धतीने केली जात असल्याने त्यांना जगभरात मोठ्या प्रमाणात मागणीकायम असते . या द्राक्ष निर्यातीत आफ्रिका, पेरू चिली हे देखील प्रमुख देश असून त्यांच्या वाढत्या स्पर्धेला सुद्धा आपल्या भारतातील द्राक्षांना तोंड द्यावे लागत आहे. भारतातील भाजी पाला व फळे यांना मागणी असल्याने केंद्र सरकारने त्याला अधिक बळकटी मिळावी व जागतिक स्पर्धेतील आपल्या शेतमालास टिकून राहण्यासाठी MEIS ह्या स्कीम अंतर्गत भाजीपाला व फळे निर्यातीसाठी पाच ते सात टक्के अनुदान देण्यात येत होते .खास करू द्राक्ष पिकाला साधारण सात टक्के निर्यातीसाठी अनुदान मिळत होते परंतु नंतर ते कमी करण्यात आले होते पण सध्या एक जानेवारी पासून ह्या MEIS स्कीम मध्ये कुठलेही प्रावधान नसल्याचे दिसत असल्याने केंद्र सरकारने ह्यात त्वरित लक्ष घालून द्राक्ष निर्यातीस निर्यात अनुदान ह्या स्कीम अंतर्गत द्यावे. जागतिक बाजारपेठेत इतर देशांकडून वाढती स्पर्धा लक्षात घेता व आपल्या देशातील द्राक्षांच्या तुलनात्मक किमतीत त्यांच्या किमती कमी असल्याने त्यांच्याकडून मोठ्या स्पर्धेस तोंड द्यावे लागत आहे . जागतिक बाजारपेठेत आपले स्थान टिकवण्यासाठी द्राक्षनिर्यातदार शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असून ही अनुदानरुपी मदत जर मिळाली तर निश्चितच याचा मोठा फायदा ह्या निर्यातदार शेतकऱ्यांना होणार आहे.ह्या बाबत अपेडाच्या अधिकाऱ्यांशी ही सकारात्मक चर्चा झाली असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुषजी गोयल यांचेकडेही पत्राद्वारे निर्यातअनुदान मिळावे म्हणूनखा .डॉ. भारती पवार यांनी मागणी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button