Maharashtra

शिर्डी नगरपंचायत ची माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते पाटील यांनी लक्ष्मी नगर रहिवासी भागातील नागरिकांना केले किराणा वाटप

शिर्डी नगरपंचायत ची माजी उपनगराध्यक्ष निलेश दादा कोते पाटील यांनी लक्ष्मी नगर रहिवासी भागातील नागरिकांना केले किराणा वाटप

प्रतिनिधी राहुल फुंदे

अजितदादा_पवार फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.उपनगराध्यक्ष निलेशदादा कोते यांचे कडुन लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये जवळपास 350 कुटुंबांना मदतीचा हात म्हणून किराणा मालाचे वाटप करण्यात आले..
सध्या संपुर्ण भारतामध्ये लाॅक डाऊन ची परीस्थिती असल्यामुळे अर्थव्यवस्थेचे तिन तेरा वाजले आहेत. अश्या अवस्थेमुळे सर्वसामान्य जनतेचे खुप हाल होत आहेत..शिर्डीतील लक्ष्मीनगर वसाहत ही बहुतांशी हातावर पोट असणारी वसाहत..याचकारणामुळे निलेशदादा कोते यांनी येथील 350 कुटुंबांना किराणा माल देत आपल्या परीने मदतीचा हात दिला आहे..
अन्नदान करीत असताना घेणारा अडचणीत असतो,भिकारी नाही याचे भान ठेवून स्वतः कोणतेही फोटोसेशन न करता आपली मदत गरजूवंतांपर्यंत पोहचविणेच महत्त्वाचे आहे याची जाणीव निलेशदादांना आहे म्हणुनच आपल्या मित्रपरीवाराच्या सहाय्याने किराणा मालाची घरपोच सेवा देण्यात आली.. कोणताही वैयक्तीक स्वार्थ न ठेवता व लक्ष्मीनगरच्या जनतेबाबत विशेष प्रेम बघता निलेशदादा हे कायम लक्ष्मीनगरवासियांच्या अडचणीत धाऊन येत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले..
याकामी लक्ष्मीनगर मधील निलेश जाधव, साई कोतकर, किरण माळी, सागर हिंगणे, रवी मगर,अजय जगताप, निवृत्ती वाडेकर,युनुस शेख,दिनेश वारियर,नाना साबळे, राकेश मगरे, ऋत्तीक भोसले, प्रसाद जाधव,साई जाधव,प्रदिप साबळे, पार्थ वाडेकर, वामन गोफने,दवेश गोफने,सुनील नरोडे, सचिन चव्हाण अदिंनी मनोभावे सहकार्य केले….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button