पाल येथे शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक संपन्न.
सलीम पिंजारी
सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र,पाल यांच्या मार्फत या वर्षाची शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.केळी पिकापासून धागा निर्मिती, जैविक खत व खाद्य पदार्थ तयार करणारे मशीन तयार करणे बाबत के व्ही के ने अटरी पुणे सोबत संशोधनासाठी प्रयत्न करावा,पाणी संवर्धनासाठी तीन महत्वाच्या बाबी होणे आवश्यक आहेत त्यात मेगा रिचार्ज प्रकल्प आमलात यावा,तापी नदीवरील उपसा जलसिंचन योजना पुनर्जीवित व्हाव्यात व शासन आणि लोकसहभागातून दरवर्षी नदीनाल्यात पडणारे पावसाचे पाणी जिरविण्याचा उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्नशील राहू तसेच सोशल मीडियाचा वापर करून कृषी विज्ञान केंद्र लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन व महिला बचत गटांना उत्पादने विक्री साठी फैजपूर येथे कायमस्वरूपी विक्री दालन सातपुडा विकास मंडळ मार्फत सुरु केलेले आहे असे कार्यक्रम चे अध्यक्ष मा.शिरीष दादा चौधरी(आमदार,रावेर/यावल) यांनी सांगितले.श्री.संजय जे महाजन(प्रमुख)यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले व प्रास्ताविक केले.

शिवार फेरीच्या माध्यमातून केंद्रातील विविध उपक्रमांची माहिती करून देण्यात आली. या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या, पीक सरंक्षण व पशु संवर्धन या विभागानुसार केलेल्या कार्याचे सादरीकरण करण्यात आले व पुढील वर्षासाठी कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली.त्याच प्रमाणे पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या बैठकीस भारतीय कृषी अनुसंधान परिषद,नवी दिल्ली अटरी, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ.अंकुश कांबळे यांनी विषयानुसार मार्गदर्शन केले.कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली तसेच मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी व्यासपीठावर श्री.अजित खुशालपाटील(सचिव,सावीम),वसंतराव महाजन(प्रगतिशील,शेतकरी),श्री.संभाजी ठाकूर(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगांव),श्री.श्रीकांत झाम्बरे(व्यवस्थापक,नाबार्ड,जळगांव),शेतकरी कंपनीचे सदस्य,महिला गटांचे सदस्य,प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.आभार डॉ धीरज नेहेते यांनी तर सूत्रसंचालन श्री.महेश महाजन यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के व्ही के कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.






