Nandurbar

सुझलॉन टॉवरची केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

सुझलॉन टॉवरची केबल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

नंदुरबार फहिम शेख

दिनांक 05/11/2021 रोजी रात्री 10.00 वा. पुर्वी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भोणे शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक K-501 येथुन 1 लाख 18 हजार 125 रुपये किंमतीची 337 कि.ग्रॅ. वजनाची एकुण 225 मिटर व दिनांक 01/12/2021 रोजी शनिमांडळ शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक K-418 मधुन 1 लाख 10 हजार 250 रुपये किमंतीची 210 मिटर तांब्याची केबल चोरीला गेल्याने सुझलॉन कंपनीचे सिक्युरिटी मॅनेजर तुकाराम सुकदेव झावरे यांचे फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दोन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील सर्व आरोपी अटक करुन चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करणे व गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेशीत केले. वरिष्टांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आपल्या बातमीदारांना सक्रीय केले व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीतांबाबत माहिती काढुन त्यांच्या हालीचालींवर लक्ष ठेवणे बाबत सुचना दिल्या दिनांक 07/12/2021 रोजी पोलीस निरीक्षक श्री रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चाकळे ता.जि. नंदुरबार येथील सागर पाडवी व त्याच्या साथीदारांनी मिळुन भोणे व शनिमांडळ शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरील केबलमधील तांब्याची तार चोरी करुन ती नवापुर व नंदुरबार शहरातील भंगार घेणाऱ्या इसमांना विकलेली आहे अशी बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी सदर माहितीबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांना माहीती दिली. मिळालेल्या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ चाकळे येथे पाठवुन संशयीतास ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकळे ता. जि. नंदुरबार येथे जावुन संशयीत सागर पाडवी याची माहिती काढुन त्यास ताब्यात घेवून सुझलॉन तार चोरी बाबत विचारपुस केली असता तो उड़वा उडवीची उत्तरे देव
लागला, म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने 2 ) संदीप सन्या गवळे वय-22 3 ) विजय गन्सु ठाकरे वय-29 4 )भागवत रमण पानपाटील वय 305) सन्या गन्सु ठाकरे वय 306) श्रावण भाईदास ठाकरे वय-28 सर्व रा. चाकळे ता.जि. नंदुरबार यांचे मदतीने मागील 7 ते 8 दिवसातील भोणे व शनिमांडळ शिवारात असलेल्या सुझलॉन टॉवरवरील केबलमधील तांब्याची तार चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच यामध्ये सुझलॉन कंपनीचे सुरक्षारक्षक रविद्र देवीदास सोनवणे वय 38 वर्षे रा. चाकळे ता.जि. नंदुरबार हे देखील अंतर्भुत असुन त्यांनीच सदरची तांब्याची तार चोरी करण्यास सांगितले होते. अशी माहीती सांगितली. रविद्र देवीदास सोनवणे यांनाताब्यात घेवून त्याच्याकडेस सखोल चौकशी केली असता सदरची तांब्याची तार ही इसम नामे अल्ताफ मिर्झा यांचे मध्यस्थीने नंदुरबार येथील भंगारवाला यास विकली असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यामुळे अल्ताफबेग मोहम्मद मिर्झा वय 44 वर्षे रा. गाझी नगर, नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तांब्याची तार हि काळ्या मशिद येथील मोहसीन भंगारवाला यास विकल्याचे समजले भंगारवाला मोहसिन रहिमोद्दीन शेख वय 33 रा. काळी मशिद जवळ नंदुरबार यास ताब्यात घेतले असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. परंतु त्यास विश्वासात घेवून विचारना केली असता. त्याने चोरीची तांब्याची तार विकत घेतली असल्याचे कबुल केले. तसेच त्याचे कडुन काही तांब्याची तार हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले. उर्वरीत तांब्याची तार ही त्याने नवापुर येथील भांड्याचा व्यापारी यास विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नवापुर येथे जावुन भंगारचा व्यापारी भिकन रज्जाक शहा वय 29 वर्षे रा. अमनपार्क, नवापुर जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून उर्वरित तांब्याच्या तारे बाबत विचारणा केली असता त्याने सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर त्यास पोलीसांनी खाक्या दाखविताच त्याने त्याच्याकडेस असलेली सर्व तांब्याची तार ही पोलीसांना काढुन दिली. अशा रितीने स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल असलेले सुझलॉनचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणुन एकुन 337 कि. ग्रॅम तांब्याची तार 1 लाख 59 हजार 600 रु. किं ची हस्तगत केली आहे. तसेच यामध्ये आता पर्यत 10 आरोपीना अटक केली असुन आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपिता कडुन आणखी गुन्हे उघडकीस येतील असे मा. पोलीस अधिक्षक, नंदुरबार श्री.पी. आर. पाटील यांनी सांगितले सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अमंलदार अभय राजपुत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण, शोएब शेख, रमेश साळुंखे यांचे पथकाने केली असुन मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button