Pandharpur

चर्मकार समाज बांधवांना मनसेची मदत

चर्मकार समाज बांधवांना मनसेची मदत

रफिक आतार

पंढरपूर, लाऊकडाऊनमुळे छोटे मोठ्या व्यवसायांना घरात बसून पोट कसे भरायचे याची चिंता लागली आहे. हातावरचे पोट असणारे गरीब व मजूर लोकांचे हाल सुरु आहेत.रस्त्यावर बसून गटईचे काम करणारे अनेक चर्मकार बांधवांचाही व्यवसायही बंद पडला आहे. अशा गरीब व गरजू लोकांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.येथील संताबाई मठात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक अदित्य फत्तेपूरकर यांच्या उपस्तीत मदतीचे वाटप करण्यात आले.कोरोनाचे संकट अधिकच घोंगावू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हातावरचे पोट असणारे अनेक गरीब मजूर व व्यवसायिक घरात बसून आहेत. हातचा व्यवसाय बंद झाल्याने अनेकांची उपासमार सुरु झाली आहे.अजून किती दिवस लाॅकाऊनचा काळ असेल हे सांगता येत नसल्याने गटईचे काम करणाऱ्या चर्मकार समाजातील गरीब व्यवसायिकांचे सध्या हाल सुरु आहेत.दैनंदिन सुरु असलेला चर्मकारीचा धंदा बंद झाल्याने दररोजच्या पाेटा पाण्याची पंचाईत झाली आहे. कुठूनच मदत मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर ही अर्थपोटी राहाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.त्यांची ही वेळ जाणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर शहरातील चर्मकार समाजातील गटईचे काम करणार्या गरीब व गरजू लोकांना गहू,तांदुळ,साखर, आदीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरजेला अन्नधान्य मिळाल्याने गटईचे काम करणाऱ्या अनेकांनी मनेसेेचे नेते दिलीप धोत्रे यांचे आभार देखील मानले.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, अर्जून जाधव, सागर घोडके, कृष्णा मासाळ,समाधान डुबल, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शैलेश आगवणे, आबा आगवणे,सुनिल अागवणे, नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button