Maharashtra

लोकांच्या मनातील कोरोना योद्धे सावदा येथील डाॅ अन्सार खान व डाॅ वसीम खान

लोकांच्या मनातील कोरोना योद्धे सावदा येथील डाॅ अन्सार खान व डाॅ वसीम खान

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

कोरोना महामारी संपूर्ण जगाला कडुन चुकलेली असुन देशातील लोकांचे जिव वाचवण्या करीता सरकार व यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहेत. यात भार लावण्या करीता विविध क्षेत्रातील कोरोना योद्धे आपली सेवा व त्यागाची भुमिका घेत आहे.
देशात लाक डाउन सुरू झाल्या पासून ते आजतागायत अहोरात्र लोकांसाठी स्वतः चे जिवाची प्रवाह न करता व आपले वैद्यकिय पेशेला व्यवसायाचे पंख लागू न देता सेवा भावाने या संकट काळात शहरातील लोकांना आपली गरज आहे याची जाणीव ठेवून घरोघरी प्रत्येक गल्लीबोळात जावून तसेच रूग्णालयात उपचार करण्याचे अनमोल व कौतुकास्पद कार्य जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील असलेले सावदा गाव व परिसरात डाॅ अनसार खान व डाॅ डाॅ वसीम यांनी केले आहे व करीत आहे.

लाक डाउन काळात लोकांची रुग्णांची तपासणी व उपचारास त्यांची योग्यता बाबत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कडुन त्यांना ऑनलाइन प्रमाण पत्र सुध्दा प्राप्त झाले आहे. त्यांच्या रुग्णालयात सरकारने घालून दिलेले सर्व अटींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. रुग्णालयात येणारे प्रत्येक रुग्ण व त्याच्या सोबत येणारे प्रत्येक व्यकती मध्ये सोशल डिसटनसिंग ठेवण्यास व तोंडाला मासक लावणे करीता प्रेमाने समजावून भाग पाडण्याचा कौतुकास्पद कार्य डॉक्टरांचे भाऊ रईस खान गुलाम गौस खान हे सतत करीत आहे.

ज्यांनी या संकट काळात आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असे गृहीत धरून कोरोना योद्धे महणुन आपल्या जीवा ची प्रवाह न करता लोकांचे जिव वाचविले आहे.सरकारला हातभार लावले आहे त्यांचे सन्मान देशात विविध संस्थाच्या वतीने कोरोना योद्धे महणुन मान्यवरांच्या हस्ते प्रमाण पत्र दिले जात आहे या मुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल व तयांचे चांगले कार्य पासुन अनेक बोध ही घेतील परंतु असे अनेक कोरोना योद्धे आहे की त्यांना सध्या तरी प्रमाण पत्र मिळाले नसले तरी त्यांनी आपले चांगले कार्य व त्यागा मुळे लोकांच्या मनात कोरोना योद्धे महणुन स्वतः ची छाप उमटवली आहे. यांच्यात सावदा येथील डाॅ अनसार खान व डाॅ वसीम खान सुध्दा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button