Yawal

9 व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने यशाची परंपरा कायम ठेवली….

9 व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने यशाची परंपरा कायम ठेवली….

यावल ( शब्बीर खान )-

9 व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने कबड्डी, तायक्वांडो व योगा कुस्ती स्पर्धेत विविध पदकांची लयलूट करून जळगाव जिल्ह्याची यशस्वी परंपरा खेळाडूंनी कायम ठेवली आहे. पुढे हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या सर्व खेळाडूंची निवड झाली आहे. 9 जुलै ते 11 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा संघातर्फे कबड्डी स्पर्धेत जामनेर येथील संघाने कांस्य पदक, तर योगा मध्ये 22 वयोगटात सन्मुख गणेश महाजन ( गोल्ड मेडल) व 17 वयोगटात गौरी गणेश महाजन ( सिल्व्हर मेडल) मिळविले. यासोबत तायक्वांडो स्पर्धेत मोहिनी राऊत (गोल्ड मेडल), वृषाली पवार ( गोल्ड मेडल), तृप्ती घोंगडे ( सुवर्णपदक), गायत्री कुमावत ( गोल्ड मेडल), आकांशा जाधव ( गोल्ड मेडल), पलक जोशी (सिल्व्हर मेडल), निकिता घोंगडे ( सिल्व्हर मेडल), दिव्या जोशी ( कांस्य पदक), सुमित चौधरी ( गोल्ड मेडल), भूषण मगरे ( गोल्ड मेडल), दिनेश घोंगडे (गोल्ड मेडल), वेदांत क्षीरसागर ( सिल्व्हर मेडल), ईश्वर क्षीरसागर ( सिल्व्हर मेडल), हर्षल उदमले (सिल्व्हर मेडल), सतीश क्षीरसागर ( कांस्य मेडल), धीरज घोंगडे ( कांस्य पदक) दिनेश राऊत ( कांस्य मेडल) मिळाले. सर्व विजयी खेळाडूंचे स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, उपाध्यक्ष दिव्या पाटील, सचिव योगेश चौधरी, सदस्य कोमल पाटील, रोहन महाजन, रितेश भारंबे, पायल मोराणकर, स्वप्नील निकम यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत. योगा प्रशिक्षक गणेश महाजन सर, तायक्वांडो प्रशिक्षक सुनील मोरे सर, शंकर भामेरे सर, अजित घारगे सर यासोबत कबड्डी प्रशिक्षक पवन पाटील सर व अविनाश राठोड सर यांनी खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button