आगे खुन प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकीलांची नेमणुक करावी-भीम आर्मी
प्रतिनिधी:–सुनील नजन
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा. ता.जामखेड येथे दि.28 एप्रिल 2014 रोजी नितिन आगे या तरूणाची अत्यंत अमानुषपणे गावातील जातीयवादी लोकांनी भरदिवसा हत्या केली होती.ह्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले होते जिल्हा न्यायालयात हा खटला सुरू झाल्यानंतर या प्रकरणातील 13 महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले त्यामुळे 10 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती त्यानंतर राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल करून विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उमेशचंद्र यादव (पाटील ) हे काम पाहत होते परंतू या प्रकरणातून त्यांनी अचानकपणे माघार घेतली आहे. तसे पत्र देखील त्यांनी गृहविभागाला दिलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या खुन खटल्यासाठी तज्ञ,व निष्पाक बाजू मांडणा-या वकीलांची नियुक्ती करावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली आहे. गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याशी भम्रणध्वनी वरून संपर्क साधला असता सदर प्रकरणाची माहिती दिली.आता हे प्रकरण सरकारी पक्षाच्यावतीने अॅड.राजेंद्र सानप पाहणार असल्याचे समजते. अॅड.सानप यांच्यासह राज्य सरकारने दुस-या विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती करून आरोपींना फाशावर लटकवले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत आणी दुर्दैवी नितीन आगेला न्याय मिळवून द्यावा अहमदनगर जिल्ह्यातील काही जातीयवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अॅड.यादव पाटील यांच्यावर दबाव तर टाकला नाही ना ??याची सखोल चौकशी करावी असे ही उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.






