Nashik

समता प्रतिष्ठान संचलित येवला समता विध्यालय सुरेगाव ला लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णासाहेब साठे जयंती उत्साहात संपन्न

समता प्रतिष्ठान संचलित येवला समता विध्यालय सुरेगाव ला लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णासाहेब साठे जयंती उत्साहात सपन्न

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:बाळ गंगाधर टिळक यांच्या बालवयातील शिक्षण संस्कार, तारुण्यातील देशप्रेम-देशभक्तीचे विचार कृती-कार्य,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी कुटुंबातील आर्थिक,सामाजिक हालअपेष्टा सोसत आपल्या साहित्य-शाहिरी कवनगीत-पोवाडे यातून मांडलेली उपेक्षित वंचितांचे व्यथा वेदना व त्यातून बाहेर पडण्याचा मुक्तीचा मार्ग आजच्या विद्यार्थी-तरुण तरुणींनी आत्मसात करावा असे मत येथील समता प्रतिष्ठान येवला संचलित समता विद्यालय सुरेगाव (रस्ता) येथे आयोजित लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलतांना मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक गणेश जाधव हे होते.
प्रारंभी मुख्याध्यापक गणेश जाधव,कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ सोनवणे,हरिभाऊ भागवत,शरद शेजवळ,व्ही.डी.सोनवणे,बाबासाहेब गोविंद,हिरामण पगार यांनी प्रतिमाना पुष्पहार अर्पून अभिमान केले.
लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनात देशासाठी व उपेक्षितांसाठी केलेल्या कार्याच्या मागोवा यावेळी बोलताना मुख्याध्यापक गणेश जाधव सर हिरामण पगार सर शरद शेजवळ सर यांनी घेतला व उभयतांच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय व साहित्यिक जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
कु.दीपाली जाधव हिने प्रास्ताविक केले. कु.पायल बागुल,तुळसी वेताळ सूत्रसंचालन केले. कु.श्रद्धा पगारे हिने आभार मानले.
कार्यक्रमास समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव चे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button