Amalner

? Big Breaking..जानवे भ्रष्टाचार प्रकरण..तक्रारदाराने घेतली न्यायालयात धाव..अधिकारी म्हणती देवा मला पाव..जळगाव जि प मुख्याधिकारी आणि अमळनेर गटविकास अधिकारी यांना उच्च न्यायालयाने फटकारले…मागविला खुलासा…

? Big Breaking..जळगाव जि प मुख्याधिकारी आणि अमळनेर गटविकास अधिकारी यांना उच्च न्यायालयाने फटकारले…मागविला खुलासा...

मुख्याधिकारी जळगांव यांच्याशी ठोस प्रहारने संपर्क साधला असता सुरुवातीला फोन उचलला नाही आणि नंतर फोन उचला असा व्हाट्सअप मेसेज केला असता ऐकू येत नाही..असा बहाणा करण्यात आला आहे…

अमळनेर प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर जानवे गावातील 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 3 लाख 26 हजार एव्हढा अपहार केल्या प्रकरणी गावातील नागरिक शरद पाटील यांनी 7 फेब्रुवारी 2019 रोजी गटविकास अधिकारी वायाळ यांना लेखी तक्रार केली होती. सदर भ्रष्टाचार ची चौकशी करून लेखी खुलासा मागविण्यात आला होता. परंतु निगर गठ्ठ सरपंच आणि गटविकास अधिकारी यांनी कायद्याची तमा न बाळगता कोणताही खुलासा किंवा कार्यवाही केली नाही. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्या मुळे तक्रार दार यांनी दि 6 ऑगस्ट 2019 रोजी संबंधित सर्व अधिकारी यांना वरील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकां वर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी लेखी तक्रार दाखल केली होती. या वरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्या मुळे 20 नोव्हेंबर 2019 रोजी तक्रार दार यांनी उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2020 च्या आदेशानुसार संबंधित अपहार करणाऱ्या व्यक्तीं विरुद्ध कोणतीही कार्यवाही आज ता गायत केली नाही. त्यामुळे संबधित अपहार कर्त्यांची पाठ राखण करत असल्याचे सांगत दि 15 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयात हजर राहून कायदेशीर कारवाई का केली नाही याचा खुलासा मागितला आहे.मुख्य तक्रारदार शरद पाटील यांच्या सोबत ऍड दिनेश पाटील,तसेच औरंगाबाद उच्च न्यायालय येथील ऍड परेश पाटील यांनी काम पाहिले आहे.

अमळनेर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे भ्रष्टाचाराचे माहेरघर असून अनेक ग्रामपंचायतीचा भ्रष्ट्राचार जागृत नागरिकांनी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मनमानी कारभार असल्याने अश्या भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक यांना सतत पाठीशी घालत आहेत. परिणामी सामान्य जनतेचा अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील विश्वास उडत चालला असून आता सुजाण नागरिक उच्च न्यायालयात धाव घेत आहेत. ही अत्यन्त खेदाची बाब असून अधिकारी हे जनतेच्या सेवे साठी पदां वर कार्यरत असतात परंतु अमळनेर तालुक्यातील जि प आणि प समिती येथील भ्रष्ट कारभार नजरेआड करणारे अधिकारी हे देखील तितकेच जबाबदार आहेत. अमळनेर तालुक्यातील मठ गव्हाण,एकलहरे,कळंबे इ गावातील वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार आता पर्यंत उघडकीस आले आहेत आणि या बाबतीत तक्रारी देखिल गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांना करण्यात आल्या आहेत परंतु यावर आज पर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी सामान्य माणूस तयारीत आहे याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी माहिती काही नागरिकांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button