Dindori

दिंडोरी तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार पंकज पवार

दिंडोरी तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा तहसीलदार पंकज पवार

सुनिल घुमरे नासिक दिंडोरी प्रतिनिधी

दिंडोरी -तालुक्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यात सर्वात मंडळांमध्ये अति वृष्टी श्यकता निर्माण झाली असून तालुक्यातील ननाशी कोशिंबे वनी उमराळे दिंडोरी खेडगाव रामशेज या मंडळामध्ये पाऊस झाल्याने तालुक्‍यातील सर्वच नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील कादवा ऊनंदा बानगंगा पाराशरी कोळवण धामण या सर्व नद्यांना जोरदार पाऊस झाल्याने दिवसभर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पालखेड धरणातून हजारो क्युसेस पाण्याचा विसर्ग कादवा नदी पात्रात सुरू असून तालुक्यातील प्रशासन हाय अलर्ट वर असून तालुक्याचे तहसीलदार पंकज पवार हे तालुक्यातील सर्व मंडलावर लक्ष ठेवून असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तालुक्यातील सर्वात नदीकाठच्या गावात प्रशासन सज्ज झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे
तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे नदी नाले यांना पुराला असून पुरामुळे तहसीलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन केला असून वेळप्रसंगी नदीकाठच्या गावांना सतरतेचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे तसेच पालखेड धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मोहाडी खडक सुकेने जोपुळ चिंचखेड या गावांचा जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याकारणाने संपर्क बंद झाला आहे तर तालुक्यात विविध नद्यांना पूर आले असून त्यामुळे हे जनजीवन विस्कळीत होणार आहे जानोरी येथेही बाणगंगा नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या असलेल्या घरांना व नागरिकांना धोका असल्याने तलाठी किरण भोये व ग्रामविकास अधिकारी केके पवार यांनी संबंधित नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्याचे आव्हान केले असून बाणगंगा नदीच्या पुरामुळे जानोरी ओझर या परिसरात प्रशासनाला अलर्ट राहावे लागणार आहे तर तालुक्यातील बऱ्याच भागात नदी नाल्यांवरचे पूर वाढल्याने काही ठिकाणी पुलाचे कठडे तर पाईप वाहून गेले असून काही ठिकाणी मोरया वाहून गेल्या आहेत त्यामुळे ही कामानिमित्ताने गेलेल्या नागरिकांचे तसेच शेतातील शेतकरी व मजूर नागरिकांचे हाल झाले अंबानेर भागातही रस्त्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेल्याचे समजत आगामी चार दिवस पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे असे आव्हान दिंडोरी तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन समितीचे पद व त्यांचे मोबाईल नंबर जनतेसाठी कळविण्यात आले आहे प्रसंगी जनतेने तात्काळ संपर्क साधून सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान आपत्ती व्यवस्थापन समिती व दिंडोरीचे तहसीलदार श्री पंकज पवार यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button