सिद्धेवाडी येथून माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर तालुका पोलिसांची कारवाई
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी नजीकच्या माण नदीपात्रातून बिगर नंबरच्या पिकअप वाहनातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यानी केलेल्या कारवाईत अंदाजे एक लाख रुपये फोर्स कंपनीचा पांढ-या रंगाचा बिगर नंबरचा पिकअप टँम्पो व 8000/- वरिल पिकअप टँम्पो मध्ये एकब्रास वाळू जप्त करण्यात आली असून या प्रकरणी भैय्या रोकडे रा. मुंढवे ता.मंगळवेढा व अज्ञात अन्य एक व्यक्ती यांच्या विरोधात भादवि 379, 34 सह गौण खनिज कायदा कलम 4(1)4(क)(1) व 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.स.ई. वसमळे,पो.हे.कॉ. उबाळे,पो.ना चंदनशिवे,पो.कॉ.वाघमारे यांनी भाग घेतला.या प्रकरणी चा.पो.कॉ.अनिल वाघमारे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे माण नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर वचक बसणार आहे.







