?Crime Diary..महिला अध्यक्षांच्याच गळ्यातील गंठन चोरट्याने केले लंपास
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला आघाडीच्या
जिल्हाध्यक्षा साधना रामचंद्र राऊत रा.भक्ती मार्ग पंढरपूर या रांजणी येथील आपल्या शेतातून पंढरपुरातील घराकडे येत असताना गोपाळपूर रस्त्यावरील कुंभार वीटभट्टी नजीक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी राऊत यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसका मारून खेचून गोपाळपूर कडील दिशेने भरधाव वेगात निघून गेला असल्याची घटना घडली आहे याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे या घटनेची नोंद करण्यात आली असून वारंवार अशा होणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे.याबाबत पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी अशा घटनांना वेळीच पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे.या अगोदर पंढरपूर तालुक्यातील विविध ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत त्यातील अनेक घटनांचा कसल्याही प्रकारचा सुगावा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना अद्यापही लागला नसल्याने महिलांमधून त्यांच्या कामकाजा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.






