Paranda

पत्रकारांच्या प्रलंबीत मागन्या तात्काळ मान्य करा पत्रकार संघाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे मागणी

पत्रकारांच्या प्रलंबीत मागन्या तात्काळ मान्य करा पत्रकार संघाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे मागणी

सुरेश बागडे परंडा

परंडा : पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्यात यावे अन्यथा दिनांक ७ जानेवारी रोजी परंडा तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि १ जानेवारी रोजी तहसीलदार परंडा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार संघटनेच्या वतीने शासना कडे महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी तालुका स्तरावर पत्रकार वसाहत निर्माण करावे व पत्रकारांच्या वाहनांना टोल फ्री करावे तसेच अधिस्वीकृती धारक पत्रकार प्रमाणे प्रत्येक पत्रकारांना सवलती लागू कराव्या यासह विविध मागण्या मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या होत्या मात्र शासनाकडून पत्रकार यांच्या मागण्या बाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याने दिनांक ७ जानेवारी रोजी परंडा शाखेच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देऊन लक्षणीक उपोषणाचा ईशारा देण्यात आला

या वेळी ना.त ईनामदार व पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांनी मागणी चे निवेदन शासनास तात्काळ पाठवीण्याचे अश्वासन पत्रकारांना दिले

निवेदनावर निसार मुजावर भजनदास गुडे , उमेश सोनवणे, मुजीब काझी , मनोज परंडकर , तुकाराम गंगावणे , सुरेश बागडे , गणेश वाघमोडे, अप्पासाहेब शिंदे, समीर ओव्हाळ , शंकर घोगरे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button