Chalisgaon

राष्ट्रमाता जिजाउंचे विचार आत्मसात केल्यास रयतेचे राज्य येईल – आमदार मंगेशदादा  चव्हाण

राष्ट्रमाता जिजाउंचे विचार आत्मसात केल्यास रयतेचे राज्य येईल – आमदार मंगेशदादा चव्हाण

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त रयत सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन

मनोज भोसले

चाळीसगाव प्रतिनिधी – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनी दोन छत्रपती घडवले त्यामुळेच शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले अशा आदर्श मातेचे विचार आत्मसात केल्यास नक्कीच रयतेचे राज्य येईल लोकप्रतिनिधींनी चांगले काम केले तर खऱ्या अर्थाने जयंती सत्कर्मी लागेल असे प्रतिपादन आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी रयत सेना आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून रयत सेना दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी दिनांक 12 रोजी येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंगेश दादा चव्हाण तर प्रमुख उपस्थिती दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सरदार राजपूत ,प स सभापती अजय पाटील, जि प सदस्य पोपट तात्या भोळे, बीएसएफ जवान विजय कोल्हे ,आर्मी जवान विठ्ठल सावंत, मा जि प सदस्य किशोर पाटील ,प स सदस्य बाजीराव दौंड, प्रा साधना निकम , नायब तहसीलदार विशाल सोनवणे ,युवा व्याख्याते आकाश पाटील, खानदेशी रक्षक ग्रुपचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, हिरापूर ग्रामपंचायत उपसरपंच संतोष निकुंभ , नगरसेवक घुष्णेश्वर पाटील, रामचंद्र जाधव ,दीपक पाटील, भिकन पवार, पत्रकार संघाचे एम बी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ .शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते रयत सेना दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले की रयत सेनेचे याचे कार्य अनेक वर्षापासून बघतो आहोत समाजातील समस्या सोडवुन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम करून कुठल्याही पक्षाचे लेबल न लावता संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे एखादा तरुण कार्यकर्ता अशा पद्धतीने काम करतात अनेक समस्या निर्माण होऊन देखील त्यास न जुमानता रहेना अनेक वर्षांपासून शेतकरी विद्यार्थी महिला तळागाळातील त्यांच्यासाठी वेळोवेळी सातत्याने काम करून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देऊन न्याय देण्याचे काम केले आहे. रयत सेनेच्या कार्याचा गौरव करत त्यांचे कौतुक केले आहे . प्रास्ताविकातून रयत महिला जिल्हाध्यक्षा प्रा साधना निकम यांनी राष्ट्रमाता जिजाऊने दोन छत्रपती घडवले आणि आताची जिजाऊ जी चूल आणि मूल यांच्यातच स्वतःला गुंतवून ठेवण्यात धन्यता मानत आहे तेव्हा आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या पण राजांनी जन्म घ्यावा तो शेजारच्या घरात जिजाऊंनी जन्म घ्यावा तो देखील शेजारच्या घरात पण आपल्या घरात का नको त्यावेळची धगधगती परिस्थिती होती त्या परिस्थितीत शहाजीराजे निजामशहाच्या दरबारात असताना त्यावेळी जिजाऊंनी सर्व परिस्थितींना धैर्याने आणि धाडसाने तोंड देण्याचे काम केले अशा आदर्श माता जिजाऊंची जयंती करून रयत सेना समाजात चांगले विचार रुजविण्याचे कार्य करत असुन रयत सेनेच्या वतीने आरोग्य शिबिर ,विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर ,महिलांचा गौरव व विविध क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचे काम करत असल्याचे सांगितले तर तर दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील म्हणाले की राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य व विचार अनमोल आहेत महिला भगिनींनी त्यांचे विचार आत्मसात करावेत असे सांगून रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार हे उपक्रमशील कार्यकर्ता आहे तळागाळातील जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहून जनतेच्या न्याय हक्कासाठी निस्वार्थीपणे लढा देत असतात तर तर सातत्याने कार्यक्रम ,आंदोलन रयत सेनेच्या माध्यमातून ते करत असतात असे सांगत संघटनेचे कौतुक केले , जिल्हा परिषद सदस्य पोपटतात्या भोळे यांनी रयत सेनेचे कौतुक करत रयत सेना महापुरुष महामातेचे विचार घेऊन त्यांच्या जयंत्या साजरा करतात गरजू पीडित यांना मदत करून विद्यार्थी शेतकरी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पुढाकार घेतात असे सांगून राहत सेनेच्या कार्याचा गौरव केला, कुमारअवस्थेत राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर योग्य ते संस्कार केले त्याचे फलित आज बारा बलुतेदार अठरापगड जाती आज तुमच्या आमच्यासमोर बसू शकल्या आणि मी समाधानाने बोलू शकलो हे राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळेच . राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्ताने प्रथम अभिवादन करतो असे सांगत रयत सेना प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजाचे काम करत असल्याचे युवा व्याख्याते आकाश पाटील यांनी सांगितले तर सूत्रसंचालन अजिज खाटीक यांनी तर आभार प्रदर्शन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केले याप्रसंगी प्रा रवि जाधव ,शिवाजी पवार ,अभिमन्यू जाधव, गोकुळ पाटील ,शुभम पवार, लहू बाबर ,राम पाटील, डॉ राजेंद्र भवर ,योगेश गव्हाणे, विनायक मांडोळे, प्रा शामकात निकम, पी ए पाटील ,दत्तात्रय पाटील, अशोक सोनवणे ,संजय पाटील ,खुशाल पाटील ,सतीश पवार ,अनिल पवार, सुनिल पवार, दिलीप पवार ,रमेश पवार ,निखिल पवार, दीपक पवार मंगेश पवार कार्तिक पवार बाळू पवार चेतन पवार कमलेश पवार विकी देठे मयूर पवार यांच्यासह रयत सेनेचे ज्ञानेश्वर कोल्हे ,संतोष निकुंभ, प्रमोद वाघ, संजय कापसे ,स्वप्नील गायकवाड, सागर सूर्यवंशी, किशोर पाटील ,विलास पाटील, मुकुंद पवार, भाऊसाहेब सोमवंशी दिनेश चव्हाण, मनोज पाटील, राजू पाटील, सुनील निंबाळकर ,प्रदीप मराठे, दीपक देशमुख ,भरत नवले ,जयदीप पवार ,सागर पाटील ,शंकर जमदे, किरण पवार ,बापू डोखे , विकास पवार, जी जी वाघ अभिमन्यू महाजन, रवी पाटील अदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button