Karnatak

? धक्कादायक….शाळेच्या शिक्षिकेने  दहावीच्या विद्यार्थ्यांना लावले सोयाबीन काढण्याच्या कामाला..!मजुरीचे दाखविले आमिष..!

? धक्कादायक…शाळेच्या शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यांना लावले सोयाबीन काढण्याच्या कामाला..!मजुरीचे दाखविले आमिष..!

हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर

हुलसूर येथील प्रतिष्ठित शाळा तसेच नावाजलेली शाळा पण आता पर्यंत शाळेतील शिक्षक हे देव स्वरूप पाहिले जात होते पण आता नवीन शिक्षक आलेले हे विद्यार्थ्यांना घडवीण्याचे काम सोडून विद्यार्थाच्या हातात विळे देऊन सोयाबीन काढण्यासाठी शेतात मजुरीने घेऊन गेलेली लाजीरवाणी घटना हुलसूर येथे घडली आहे.

हुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज विद्यालया मधील शिक्षिका सौ.मोहीनीबाई तुकाराम झाकडे यांनी दि.२ आक्टोबंर व ३ आक्टोबंर दोन दिवस सात दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत न बसु देता शेतात सोयाबीन काढण्यासाठी ३०० रुपये मजुरीची लाच दाखवत शेतातील सोयाबीन काढुन घेतले व शेतातील सोयाबीन काढण्याचा विद्यार्थाच्या पालकांना याचा पत्ता देखील नाही पालक ही माहिती ऐकून आचंबीत झाले आहेत.

शिक्षिका मोहीनीबाई याचे पती हे तुकाराम यांनी सविस्तर माहिती दिली की माझी पत्नी ने विद्यार्थ्यांना घेऊन आढीच एकर सोयाबीन काढण्यासाठी दिली आहे ईतकच तुम्ही का विद्यार्थ्यांना काम दिले विचारना केले असता तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे उडवाउडवीची उत्तरे दिली.
शाळेत विद्यार्थ्यांना पुर्व सुचना दिली गेली होती की तुम्ही शाळेत उपस्थित न देता शेतात येवून काम करा व घरीही सांगु नका असे शिक्षिका विद्यार्थ्यांना बजावले होते या भिती पोढी आम्ही शाळेला न जाता शेताला आल्याचे विद्यार्थी सांगत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button