अन्यथा एन.टी.पी.सी.मनोरे उभारण्यासाठी शेतकरी जमीन देणार नाहीत
शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचा इशारा
प्रतिनिधी रफिक आतार
नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात सध्या विविध मार्गावरुन एन.टी.पी.सी.वितरण वाहीनीचे मनोरे उभारण्यात येत आहेत.या मनोर्यासाठी या भागातील शेतकर्यांची बागायती जमीन संपादीत होणार आहे.एखादया शेतकर्याच्या शेतजमीनीत जेव्हा मोबाईल कंपनीद्वारे मोबाईल टॉवर उभारले जातात त्यावेळी त्या शेतकर्यास प्रतिमाह अथवा प्र्रतिवर्ष करार पध्दतीने भाडे दिले जाते.मात्र एन.टी.पी.सी.च्या टॉवरसाठी कायमस्वरुपी भूससंपादन करुन जागा व्यापली जाणार आहे.आणि त्यामुळे फार मोठा फटका या शेतकर्यांना सहन करावा लागणार आहे.सद्या या मनोर्याच्या उभारणीसाठी प्रांताधिकारी पंढरपूर यांच्या मार्फत शेतकर्यांना नोटीसा देत आहेत.मात्र योग्य तो मोबदला व भु-भाडे मिळाल्याशिवाय शेरकर्यांची एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा इशारा शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहीती देताना प्रतिष्ठाणचे जिल्हा अध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की देशभरात अशा पध्दतीने भुसंपादन प्रक्रिया राबवून शेतकर्यांना वीज वाहीनी उभारणीसाठी ज्या दराने आणि निकषानुसार दर दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी त्याच बरोबर अशा पध्दतीने शेतकर्यांच्या जमिनी ताब्यात घेताना मा.सर्व्वोच न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकलाचा आदर राखला जावा.हे मनोरे कायमस्वरुपी असणार आहेत व बागायती क्षेत्रातील शेतकर्यांना याचा फार मोठा फटका वर्षानुवर्षे सहन करावा लागणार आहे.त्यामुळेच आज आम्ही या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदन दिले असून याबाबत समाधान कारक तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलना शिवाय पर्याय राहणार नाही.
हे निवेदन देताना सागर चव्हाण,संदीप मुटकुळे,सोमनाथ ढवण यांच्यासह शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






