Kolhapur

वडगांव विद्यालयाच्या प्राचार्यपदी आर.आर. पाटील व पर्यवेक्षकपदी डी.के. पाटील.

वडगांव विद्यालयाच्या प्राचार्यपदी आर.आर. पाटील व पर्यवेक्षकपदी डी.के. पाटील.

कोल्हापूर प्रतिनिधी सुभाष भोसले
वडगांव विदयालय ज्युनिअर कॉलेज वडगावच्या प्राचार्यपदी आर.आर. पाटील तर पर्यवेक्षकपदी डी.के. पाटील यांना पदोन्नती मिळाली. दोघे बालपणीचे मित्र शालेय स्तरापासून,नोकरी व पदोन्नतीही एकत्र मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्राचार्यपदी पदोन्नती झालेले आर.आर. पाटील एकोणितीस वर्षे इतिहास विषयाचे उत्कृष्ठ अध्यापन करित आहेत. त्यांच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल काही दिवसापूर्वीच नामाकिंत लायन्स क्लब कोल्हापूरच्या वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव विण्यात आले आहे. त्यांचे उत्कृष्ठ अध्यापन,कर्तव्यनिष्ठता, नि गर्वी, प्रामाणिक व्यक्तिमत्व व प्रशासन कौशल्याच्या उत्तम कामगिरीमुळे संस्थेंनी त्यांना पर्यवेक्षक पदावरून जंपींग प्राचार्य पदाची पदोन्नती दिली आहे.

डी.के. पाटील अठ्ठावीस वर्षे विज्ञान विषयाचे उत्कृष्ठ अध्यापन करीत आहेत. वक्तृत्व, शांत,संयमी व नम्रता या स्वभाव गुणाच्या व्यक्तिमत्वामुळे ते विद्यार्थी व शिक्षकप्रिय असल्याने पर्यवेक्षकपदाची धूरा सक्षमपणे सांभाळतील. या दोन मित्रांच्या एकाच वेळी मिळालेल्या पदोन्नतीबद्दल वडगांव परिसरातून आजी माजी विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार, लोकप्रतिनिधी, समाजसेवक,नागरिक त्यांना प्रत्यक्ष भेटून अभिनंदनाचा वर्षाव करित आहेत.

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर युवानेते दौलत देसाई, प्रशासन अधिकारी मंजिरीताई देसाई, उपाध्यक्ष, माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत, कौन्सिल मेंबर बाळासाहेब डेळेकर आदींचे पदोन्नतीसाठी सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button