फैजपूर

धनाजी नाना महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

धनाजी नाना महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी.

सलीम पिंजारी

भारतरत्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे रचयिता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला विश्वात एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही असे गौरवोद्गार तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर काशिनाथ चौधरी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू जयंती तसेच बाल दिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात केले.

धनाजी नाना महाविद्यालयात नेहरू अध्ययन केंद्राच्या वतीने समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश चौधरी यांनी केले. यावेळी त्यांनी पंडित नेहरू यांचा जीवन परिचय करून दिला. यासोबत आधुनिक भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहलाल नेहरू यांचे योगदान यावर सविस्तर विवेचन केले.
सर्वप्रथम पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस प्रा एस के चौधरी, उपाध्यक्ष, तापी परिसर विद्या मंडळ, यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा ए जी सरोदे, प्रा डॉ जगदीश पाटील,प्रा डॉ जी एस मारतळे, प्रा टोके, प्रा इंगळे, प्रा बढे, नितीन सपकाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ तायडे, शेखर महाजन, चेतन इंगळे, अरुण सौंदाने, यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button