Kolhapur

केंद्र सरकारने कामगार व शेतकरी विरोधी कायदे त्वरीत मागे घ्यावेत- कॉ शिवाजी मगदूम

केंद्र सरकारने कामगार व शेतकरी विरोधी कायदे त्वरीत मागे घ्यावेत- कॉ शिवाजी मगदूम
तुकाराम पाटील कोल्हापूर
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी आंदोलनाला सहा महीने झाले तरी सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही, त्यामुळे शेतकरी व कामगारांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे त्यामुळे केंद्र सरकारने कामगार व शेतकरी विरोधी कायदे त्वरीत मागे घ्यावेत असे अवाहन लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केले आहे .
आज संपूर्ण देशभर या शेतकरी व कामगारांच्या विरोधात केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात देशभर काळा दिवस पाळण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये कागल तालुक्यातील सिटु अंतर्गत सर्वच संघटना सहभागी झाल्या असल्याची माहिती सिटुचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ शिवाजी मगदूम यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी ३ कायदे केले, कामगार हिताचे कायदे रद्द करून मालक धार्जीन संहीता केल्या त्यामुळे कामगारांचेही वाटोळे लावले आहे. पेट्रोल, डिझेलची भरमसाट दरवाढ करून भारतीय जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, देशात कोरोणासारखा संसर्गजन्य आजार फैलावत असताना देशाचे पंतप्रधान हे निवडणूक प्रचारात दंग होते. त्यामुळे देशातील लाखो लोकांना जीव गमवावा लागला. सार्वजनिक उद्योगाचेे खाजगीकरण करून बड्या भांडवलदारांना पोसण्याचे काम देशाचे पंतप्रधान मान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला व देशातील सर्व कामगार संघटनानी केलेल्या एकत्रित येऊन केलेल्या आंदोलनाला आज सहा महीने पुर्ण झाले तरी निर्ढावलेले केंद्र सरकार शेतकरी व कामगारांच्या आंदोलनाकडे जाणुन बुजून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आज देशभरातील सर्व कामगार संघटना, सर्व शेतकरी संघटना यांच्यावतिने आज गावागावात व संपूर्ण देशभर केंद्र सरकारच्या बेजाबदारपणाचा काळे झेंडे लावुन जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने सर्व आशा व गटप्रवर्तक काळ्या फीती लावुन या आंदोलनात सहभागी झाल्या तसेच बांधकाम कामगारांनी आपआपल्या घरावर, गाडीवर काळे झेंडे लावुन निषेध व्यक्त केला असल्याची माहितीही शिवाजी मगदूम यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button