सोलापूर सोशल फाऊंडेशनचा पुढाकार भंडी शेगावमध्ये विविध उपक्रमांचा प्रारंभ
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातल्या भंडीशेगाव येथे सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या समृद्ध गाव संकल्पनेतील विविध नव्या उपक्रमांचा प्रारंभ येत्या रविवार दि, १४ रोजी मा. आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमात काही गुणवंतांचा सत्कारही करण्यात येईल अशी माहिती संयोजक अजित दादा कंडरे आणि भंडीशेगावच्या ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.यावेळी भंडीशेगावच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ड्रीम पार्कची पाहणी मान्यवर करतील आणि सायंकाळी ६ वाजता सोशल फाऊंडेेशनच्या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात येईल. ही अभ्यासिका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असून तिच्यात संगणकांची सोय आहे.
संध्याकाळी सात वाजता बुद्ध विहारात काही कार्यक्रम होतील. त्यात बुद्धविहाराच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन केले जाईल. काही मान्यवरांचे सत्कार होतील आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, पो. उपअधीक्षक विक्रम कदम आणि अन्य मान्यवर उपस्थित राहतील. तहसीलदार विवेक साळुंखे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, विजय कादे, गणपतराव माडगुळकर, डॉ. अमित पावले, अभिजित पाटील, रवीन्द्र मिनियार, डॉ. अभिजित रेपाळ, प्रदीप नागणे, डॉ. भूषण कुलकर्णी, अलिशा कंडरे, मयुरी शिवगुंडे आणि मोहन अनपट यांची उपस्थिती असेल.यापूर्वी सोलापूर सोशल फाऊंडेशनने या गावात महिला, युवक आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून अनेक कामे केली आहेत. ४२ एकर जागेत वृक्षारोपण करून आदर्श उद्यान उभारले आहे. ६०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. तसेच वृक्षारोपण, सायकल रॅली, महिलांना नॅपकिन वाटप,
लॅाकडाऊनच्या काळात गरिबांना धान्याचे वाटप, महिलांची सहल, रोजगार प्रशिक्षण, अशा अनेक कामांचा त्यात समावेश आहे.







