Amalner

?️अमळनेर कट्टा…नवरीचा दुसऱ्या विवाहाचा बेत मारवड पोलिसांनी उधळला..पैसे घेऊन विवाह करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता…!

?️अमळनेर कट्टा…नवरीचा दुसऱ्या विवाहाचा बेत मारवड पोलिसांनी उधळला..पैसे घेऊन विवाह करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता…!
अमळनेर येथील मारवड पोलिसांनी नवरीचा दुसऱ्या विवाहाचा बेत हाणून पाडला आहे.यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की शहादा पो स्टे जि.नंदुरबार येथील मिसींग नं.26/21 मधील महिला हिचे दि.6/5/21 रोजी पहिले लग्न झालेले असतांना ती पुन्हा पडावत येथील मुलाशी पैसे घेवुन श्री कपिलेश्वर मंदिर येथे लग्न करत असल्याची माहिती शहादा पोलीस स्टेशनचे पोहवा 76 परदेशी यांनी दिल्याने राहुल फुला सपोनि, मारवड पो स्टे हे पो.वा 935 होळकर पोशि 2258 राठोड होमगार्ड चारूदत्त पाटील असे गस्त दरम्यान लागलीच माहिती काढुन शोध घेतला असता पडावत येथे सदर महिला तिची बहिण व मामासह दुसरं लग्न करतांना मिळुन आली.
सदर घटनेट पैसे घेऊन लग्न करणारी टोळी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही टोळी मारवड पोलिसांच्या सतर्कतेने सापडली असून दोन महिलासह तिघांना अटक करण्यात आली असून इतर फरार झाले आहेत.
सोनू राजू शिंदे रा सिद्धार्थ नगर हिंगोली हिचा विवाह भूषण संतोष सैंदाणे रा शहादा याच्याशी ६ मे रोजी झाला होता. १५ मे रोजी सोनू घरातून पळून गेली होती याबाबतीत १६ मे रोजी भूषण ने शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली होती. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल दीपक परदेशी व विश्वास साळुंखे करीत होते. हीच मुलगी कपिलेश्वर मंदिरावर आज 21 रोजी दुसरे लग्न करणार आहे अशी माहिती मारवड पोलिसांना मिळाल्यावर मारवड पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल फुला ,हेडकॉन्स्टेबल बबलू होळकर , अनिल राठोड व होमगार्ड चारुदत्त पाटील यांनी तातडीने कपिलेश्वर मंदिर गाठले तेथून लग्न करणारी टीम मुडावद तालुका शिंदखेडा येथे गेले असल्याची माहिती मिळाली त्यांचा पाठलाग केला असता तेथून ते पडावद येथे गेल्याचे समजले राहुल फुला यांनी तातडीने नरडाणा पोलिसांना कळवले.दरम्यान पडावद येथे सोनू ही लग्न सोहळा करीत असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सोनू , मावशी पूजा प्रताप साळवे रा सिद्धार्थ नगर हिंगोली, मामा योगेश संजय साठे रा शिवसेना नगर ता अकोला यांना त्यांच्या चार चाकी वाहनासह अटक केली. मुलीची आई व भाऊ पळून गेले आहेत.आरोपींना नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नरडाना पोलिसांकडून ते शहादा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button