Ahamdanagar

कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील टेलच्या भागाला पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकरी गेटतोडो आंदोलन करण्याच्या पावित्र्यात ?

कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील टेलच्या भागाला पाणी न मिळाल्याने संतप्त शेतकरी गेटतोडो आंदोलन करण्याच्या पावित्र्यात ?

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मुळापाटबंधारेच्या पाथर्डी शाखा कालव्याच्या टेलच्या चितळी, पाडळी, सुसरे,साकेगाव, अमरापूर,भगुर गावतील शेतीला पाटाचे पाणी न मिळाल्याने लाँकडाउन असताना ही शेतकरी मुळाशाखा कालव्याचे गेटतोडो आंदोलन करण्याच्या पावित्र्यात होते.पण लाँकडाउनचे सारे सरकारी नियम पाळून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे यांच्या कासारपिंपळगावा तील निवासस्थानी जाउन कार्यकर्त्यांनी टेलच्या भागातील शेतीला पाणी मिळाले नाही म्हणून राजळेसमोर कैफियत मांडली.शिवशंकर राजळे यांनी तातडीने लगेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि ना.प्राजक्त दादा तनपुरे यांच्याशी फोनवर समक्ष चर्चा केली असता ना.तनपुरे यांनी मुळापाटबंधारेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत दोन दिवसात टेलच्या भागापर्यंत पाणी गेलेच पाहिजे असे आदेश दिले.संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये क्रुषीमित्र संदिप राजळे,चितळीचे बाबा आमटे,पाडळी चे बाळासाहेब गर्जे,बबनराव बांगर,शेतकरी संघटनेचे रमेश कचरे,साकेगावचे सरपंच सुधाकर बळिद,पाथर्डी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती विष्णूपंत सातपुते हे सहभागी झाले होते. मुळापाटबंधारेचा गलथान कारभार पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतीला पाणी पुरवठा करताना टेलकडुन हेडकडे असा नियम असतानाही मुळापाटबंधारेच्या गलिच्छ कारभारामुळे पाणी देताना हेडकडच्या लोकांनी वीस मार्चपासून आवर्तन सुरु असताना ही टेलपर्यंत पाणी पुरवठा न केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते.परंतू शिवशंकर राजळे यांनी हा प्रश्न चुटकीसरशी सोडवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.लाँकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.शिवशंकर राजळे यांनी सर्व सामांन्य शेतकऱ्यांमध्ये मानाचे स्थान निर्माण केले आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button