Pandharpur

लाईफलाईन हाॅस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्याबाबत उपोषण

लाईफलाईन हाॅस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्याबाबत उपोषण

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरातील लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली रूपयांची दिशाभूल करत असुन रूग्नांची मोठी आर्थिक लुट करत असल्यामुळे या हाॅस्पिटलची महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्यात यावी या मागणीसाठी आज पंढरपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव हे उपोषणास बसले आहेत.

या अगोदर ही या काही इतर सामाजिक संघटना यांनी या हाॅस्पिटल बाबत पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे या हाॅस्पिटलच्या विविध प्रकारचे तक्रारी अर्ज दिले आहेत.

वास्तविक पहाता हे हाॅस्पिटल पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील असल्यामुळे नागरिक या हाॅस्पिटलला प्राधान्य देत आहेत परंतु त्याची कसल्याही प्रकारची कदर या हाॅस्पिटल प्रशासनास नसल्याचे दिसून येत आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी या हाॅस्पिटलच्या चुकी मुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांचा आरोप होता. एकदरीत या सर्व बाबी अता लक्षात घेता पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले या बाबत चौकशी करतील अशी अपेक्षा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button