Jalgaon

शाळेत शिक्षक  उपस्थीती बाबत सक्ती नाही – अखेर आदेश निर्गमित: शिक्षक  संघाच्या मागणीला यश

शाळेत शिक्षक उपस्थीती बाबत सक्ती नाही – अखेर आदेश निर्गमित: शिक्षक संघाच्या मागणीला यश

हेमकांत गायकवाड चोपडा

जळगांव : जळगांव जिल्ह्यात कोवीड-19 मुळे अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर केवळ चोपडा तालुक्यात 14 शिक्षकांना कोवीड 19 मुळे प्राण गमविण्याची वेळ आली व 250 पेक्षा जास्त शिक्षक व परिवार सदस्य कोरोना आजाराशी संघर्ष करीत आहेत त्यामुळे शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस योगेश सनेर यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना देखील या बाबत वस्तुस्थीतीजन्य निवेदन दिलेले होते. त्यात त्यांनी हे शैक्षणिक वर्ष संपलेले असल्याने व पुढील नवीन शैक्षणिक वर्षाबाबत मार्गदर्शन नसल्याने जिल्हा परिषद ,खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा आश्रमशाळेवर कार्यरत शिक्षकांना घरी राहून काम करण्याची मुभा मिळावी व त्यामुळे कोवीड-19 ची साखळी खंडीत करता येईल. अशी मागणी केलेली होती. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघून जिल्हाधिकारी तसेच शिक्षण उपसंचालक यांनी देखील कोरोना साखळी तोडण्याबाबत शासनाकडील संदर्भीय सुचने प्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांना आदेश दिलेले होते. अखेर सदर आदेशाची दखल घेत आज शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी ३० पर्यत शिक्षक उपस्थीती सक्तीची न करता सर्व शिक्षक संवर्गास घरूनच काम करण्याचे आदेश दिलेले असून या निर्णयाचे शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस योगेश सनेर यांनी स्वागत केलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button