तुळशी येथे कोविशील्ड लसीकरण कॅम्पचे यशस्वी
सोलापूर : तुळशी येथे कोविशील्ड लसीकरण कॅम्पचे यशस्वी आयोजन. २३१ व्यक्तींना विक्रमी लस देण्यात आली.
सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशी येथे कोविशील्ड लसीकरण कॅम्पचे प्राथमिक आरोग्य केंद्र मोडनिंब, उपकेंद्र तुळशी अंतर्गत आयोजन करण्यात आले. कोविशील्ड लसीकरण कॅम्पमध्ये ४५ वर्षे वयाच्या पुढील २३१ पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य भारत आबा शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पात्र लाभार्थी लक्ष्मण पाटील यांना लस देऊन लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना भारत आबा शिंदे म्हणाले की ग्रामस्थांनी लसी विषयी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता लसीकरण करून घ्यावे. शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्रीचा नियमित दैनंदिन जीवनामध्ये अवलंब करावा असे सांगितले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात यांनी कोरोना लसीचे महत्व व कोरोनासंबंधी नागरिकांनी कोणते नियम पाळावेत याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी तुळशीचे सरपंच दिगंबर माळी, उपसरपंच डॉ. शरद मोरे, डॉ.शरद थोरात, डॉ. निर्मला राठोड , आरोग्य सहाय्यक नामदेव कदम,केंद्रप्रमुख डॉ. विलास काळे ,मुख्याध्यापक राजन सावंत, नवनाथ गेंड सर,सतीश जवंजाळ सर, ग्राम विस्ताराधिकारी मोरे भाऊसाहेब ,तलाठी वैभव पाटील साहेब, बापू दगडे, मनोज शहा , पत्रकार तानाजी इंगळे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम गोरे यांनी केले. आभार संजय नाळे यांनी मानले.
कॅम्पमध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर चव्हाण सर यांनी सहकार्य केले.कॅम्प यशस्वी करण्यासाठी
जिल्हा परिषद शाळा तुळशी व सर्व वस्तीशाळा शिक्षक स्टाफ, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






