Aurangabad

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांकडून गॅसदर वाढी विरोधात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस महिलांकडून गॅसदर वाढी विरोधात आंदोलन
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : देशभरात कोरोनाचे अस्मानी संकट असतानाच केंद्र सरकारच्या वतीने महागाईचे सुल्तानी संकट जनतेवर लादण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी सत्तेत येताना जनतेला महागाईपासून मुक्तीचं ,अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. देशातल्या जनतेने त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातात देश सोपवला. मात्र पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा सगळ्याच वस्तूंचे दर वाढवून केंद्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की जनतेला जगण्यापेक्षा मरण स्वस्त वाटू लागलं आहे. यामुळेच अकार्यक्षम केंद्र सरकारचा, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी वैशाली पाटील (मराठवाडा वि. सचिव), सुनीता जगले, जया पाटील, अरुणा सोनवणे, हर्षा अंभोरे, सुजाता पाटील, सुकन्या पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button