जळोद च्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापना विरोधात काढला पायी मोर्चा
10 वीच्या विद्यार्थिनिंना उघड्यावर शौचास जावे लागते.
अध्यापना ऐवजी मोबाइल वरच व्यस्त असतात शिक्षक
न समजलेला मुद्दा विचारल्यावर विद्यार्थ्यांना दिली जाते बाहेर जाण्याची तंबी.
प्रतिनिधी, शिरपूर मनोज पावरा
तालुक्यातील जळोद येथील आश्रमशाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण न मिळणे, शौचालय, स्वच्छता, पोटभर जेवण, आजारी पडल्यावर दवाखान्या वेळेवर न नेणे आदी मुलभूत आणि गंभीर समस्या घेवून शाळा व्यवस्थापनच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढला. कित्येक मुलांच्या पायात चपलाही नव्हत्या. समस्यांसाठी ते मूले अनवाणीच पुढे सरकत होते.
10 वी पर्यंत असलेल्या या अनुदानित आश्रमशाळेत केवळ अनुदान लाटण्याचेच काम सुरू आहे. येथे एकूण 779 मुले – मुली शिक्षण घेतात. मात्र येथे ना शौचालय आहे, नाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते. स्वच्छता नाही, आजारी पडल्यावर वेळेवर दवाखाना नाही. पोटभर जेवण नाही, ग्रंथालय, प्रयोगशाळा नाही. आदी गंभीर समस्या आहेत. विशेष म्हणजे येथे मुलीही शिक्षण घेताहेत मात्र त्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते. आणि या सर्व बांबिकडे शाळा प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. 779 पटसंख्येच्या या आश्रमशाळेत दररोज केवळ 150 किंवा एखाद्या दिवशी 50-60 विद्यार्थीच उपस्थित असतात. मात्र उपस्थिती शंभर टक्के दाखवून अनुदान लाटण्याचे काम जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे प्रकल्प अधिकाऱ्यांचाही हिस्सा असल्याचे बोलले जात आहे.या आश्रमशाळेला केवळ कोंडवाडाच बनवून पैसा लाटणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे शोषण करत असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थ्यांना नियमानुसार जेवण, अध्यापन, स्वच्छता, शौचालय, दवाखान्यात वेळेवर नेणे, मुलींची सुरक्षा आदींची शाळा व्यवस्थापनाने तात्काळ व्यवस्था करावी. अन्यथा बिरसा क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल.
ईश्वर मोरे – अध्यक्ष बिरसा क्रांती दल, शिरपूर तालुका






