Paranda

पत्रकार मुजीब काझी शिक्षक संतोष भांडवलकर यांना जिवा शिवा पुरस्काराने स्नमानीत

पत्रकार मुजीब काझी शिक्षक संतोष भांडवलकर यांना जिवा शिवा पुरस्काराने स्नमानीत

बदलत्या काळातही वर्तमानपत्रावर ग्रामीण भागातील नागरीकांचा विश्वास आहे डॉ . योगेश सुरवसे

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा )दि ९

येथील स्वर्गीय अॅड प्रल्हादराव मोरे यांच्या स्मणार्थ शिवसंदेश केबल नेटवर्कच्या वतीने दर्पण दिनानिमीत पत्रकार मुजीब काझी व शिक्षक संतोष भांडवलकर यांना जिवा शिवा पुरस्कार प्रमुख पाहुणे शिक्षण तज्ञ डॉ . योगेश सुरवसे , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादासाहेब खरसडे , डॉ . विजय करळे, यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले .
‌ या प्रसंगी बोलताना डॉ . योगेश सुरवसे म्हणाले की सध्याच्या स्थितीत पत्रकारीतेत मोठे बदल झाले आहे .आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या उदेशाने पत्रकारीता सुरु केली . त्याप्रमाणेच आजच्या पत्रकारानी पत्रकारीता करुन सर्वसामान्याना न्याय मिळुन दिले पाहिजे .पत्रकार हा सर्वसामान्याचा दुवा आहे ते विसरूण चालणार नाही . आज देखील ग्रामीण भागातील नागरीक वर्तमान पत्रात छापुन आलेल्या बातम्यावरच विश्वास आहे .
‌ सध्या बदलते तंत्रज्ञण्यानाचे भान ठेवुनच पत्रकारांनी आपले काम करावे आपली मुलतत्वे टिकवुन काम करणे काळाची गरज आहे .समाजाला नवि दिशा देण्यासाठी निर्भीडपणे काम केल्यास समाजातील वंचित घटकातील सर्वसामान्याना न्याय मिळु शकेल असे मत डॉ योगेश सुरवसे यांनी व्यक्त केले .
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब खरसडे म्हणाले की कै . प्रल्हादराव मोरे यांनी परंडयात
जिवा -शिवा नावाचे साप्ताहिक सुरु केले होते . त्या सप्ताहिकात ते निर्भीडपणे बातम्या छापत होते . छापुन आलेल्या बातमीचा कोणावर परिणाम झाला तरी त्याची चिंता ते करीत नव्हते . ते कधी कोणाशी तडजोड करीत नव्हते असे अॅड खरसडे यांनी सांगीतले . डॉ . विजय करळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवसंदेश नेटवर्क केबलचे संचालक पवन सुदिप मोरे यांनी .सुत्रसंचलन अमोल आंधारे यांनी केले . तर बाळासाहेब घोगरे यांनी कविता सादर केली .
या प्रसंगी दर्पण दिनानिमीत्त परंडा तालुक्यातील सुरेश घाडगे , आनंद खर्डेकर, प्रमोद वेदपाठक , गणेश राशिनकर , आशितोष बनसोडे , अप्पासाहेब शिंदे , प्रशांत मिश्रा , निसार मुजावर , गोरख देशमाने , दत्ता नरुटे , सुहास मस्के , बालाजी बोराडे या पत्रकारांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला , कार्यक्रमाचे आभार सुदिप मोरे यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button