Pandharpur

आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरालगत असणारे सर्व रस्ते बंद करा अशी मागणी प्रांत अधिकाऱ्यांकडे केली— संतोष बंडगर

आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरालगत असणारे सर्व रस्ते बंद करा अशी मागणी प्रांत अधिकाऱ्यांकडे केली— संतोष बंडगर

रफिक आतार

सध्या महाराष्ट्र मध्ये कोरोनाचे थैमान असताना वरचे वर रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर आपले सरकार जनतेची काळजी योग्य पध्दतीने घेत आहात. तरी यंदा पंढरपूर हे श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी चे आराध्य दैवत असून आषाढी वारी सुद्धा भरणार नाही,हे आपण जाहीर केले पण भाविक हे पांडुरंग चे परम भक्त आहेत हे काही न काही करून त्यादिवशी पंढरपूर मध्ये येण्याचा प्रयत्न करणारच आणि जे वारकरी यांना प्रवेश देण्यात येणार आहे त्यांना मंदिराच्या आत प्रवेश करतानाच त्यांचे थर्मास कॅन्यानिग,करूनच प्रवेश द्यावा .सॅनिटायझर रूम मधून प्रवेश देण्यात यावा,त्यासाठी आपण पंढरपूर मध्ये येणारे टू व्हीलर वरून येणाऱ्या सर्व लोकांची पूर्ण चौकशी व तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा व ज्यांना पास देण्यात आले आहेत त्यांनी 15 दिवसांपूर्वी कोरोना ची तपासणी केलेले प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेशच देऊ नये वारीच्या काळात पंढरपुरातील भाविकांना दर्शनासाठी सोय करावी.

पंढरपूर शहरात येणारे सर्व रस्ते लहान किंवा मोठे आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावेत व पंढरपूर मध्ये येणाऱ्या सर्व लोकांची नोंद ही झालीच पाहिजे त्यासाठी आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्गाना आदेश देऊन
पंढरपूर च्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी प्रांताधिकारी कडे केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button