हल्लेखोर वाळूमाफियांचा म.रा.पत्रकार संघ रावेर तालुका वतीने जाहीर निषेध..
पत्रकारावर हल्याविरोधात तहसीलदार व उपसहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदन ……
रहीम शेख खिर्डी
खिर्डी : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका प्रतिनिधी व तालुक्यातील नामवंत निर्भीड पत्रकार भिका पाटील हे वाळू माफीयांच्या विरोधात बातम्या लावतो या कारणाने वाळू माफीयांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला अत्यंत निंदनीय असून तालुक्यातील वाळू माफीयांची मजल आता पत्रकारांवर हल्ला करण्याएवढी त्यांची मजल गेली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका वतीने या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत असून पोलिसांनी या भ्याड हल्ला करण्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच महसूल विभागानेही तालुक्यातील सर्व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफीयांच्या विरोधात कडक कारवाई करावी.*
अशी मागणी रावेर तहसीलदार तसेच रावेर पोलीस स्टेशन
यांना निवेदन देण्यात आले.
तसेच सदर प्रती रवाना करण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव,प्रांत कार्यालय फैजपूर यांना फॅक्स करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल,तालुका संघटक प्रदीप महाराज पंजाबी ,तालुका सहसंघटक विनायक जहुरे , सल्लागार सरदार पिंजारी, ,प्रमोद कोंडे ,संभाजी पाटील , नूर मुहंमद तडवी,हमीद तडवी,संकेत पाटील,विजय कोळी,तेजस महाजन ,व रावेर तालुक्यातील ग्रामीण व इतर पत्रकार उपस्थित होते.






