Chimur

अतिक्रमितांच्या हक्काच्या गाळ्यासाठी महसुलमंत्र्यांना साकडे गाळे बांधकामासाठी डॉ. अविनाश वारजुरकरांचे निवेदन

अतिक्रमितांच्या हक्काच्या गाळ्यासाठी महसुलमंत्र्यांना साकडे
गाळे बांधकामासाठी डॉ. अविनाश वारजुरकरांचे निवेदन

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर येथील मुख्य मार्गावर तहसील व एसटी आगार च्या संरक्षक भिंतीला लागून गावातील तरुणांनी विविध प्रकारची दुकाने थाटली .यामूळे रहदारीस त्रास होतो या कारणाने त्यांचे अतिक्रमण चिमूर येथील श्रीहरी बालाजी यात्रेपुर्वी काळण्यात आले .ज्यामूळे या तरूणांना कुंटूबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे .याकरीता त्यांनी गाळे बांधुन देण्याच्या मागणीचे निवेदन खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश वारजुरकरांना केली .अतिक्रमणधारकांना हक्काचे गाळे मिळावे व हे बांधण्या करीता नगर परीषदेला निधी मिळण्या करीता महसुल मंत्री तथा परिवहन मंत्र्यांना साकडे घातले .
चिमूर शहरामध्ये मोठे उद्योग थंदे नसल्याने बेरोजगार युवकांचे प्रमाण खुप वाढलेले आहे .स्वतः सोबतच कुटंबाच्या उदर निर्वाहाकरीता काही युवकांनी आगार व तहसील कार्यालय परीसराच्या संरक्षक भिंतिला लागून विविध प्रकारची दुकाने थाटली .राष्ट्रिय महामार्गाचे बांधकाम आणी मूख्य मार्गाने दुचाकी , चारचाकी तथा नागरीकांची वाढलेली रहदारी यांस त्रास होत होते .मार्गाच्या बाजुला असलेल्या या दुकांनाचा त्रास श्रीहरी बालाजी घोडा यात्रे निमीत्त येणाऱ्या भक्तांना तथा वाहनांना होऊ नये या करीता यात्रेपुर्वी या सर्व अतिक्रमीत दुकाने हटविण्यात आली .ज्यामूळे या दुकानदारांवर स्वतःच्या व कुंटूबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आवासुन उभा राहीला .सर्व अतिक्रमीतांनी त्यांना हक्काचे दुकान गाळे बांधुण देण्याची मागणी खनिकर्म विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश वारजुरकर तथा विधानसभा कॉंग्रेस समन्वयक सतिश वारजुरकर यांना केली .
अतिक्रमीत युवकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने महाविकास आघाडीच्या मंत्र्या कडे अतिक्रमणधारकांना गाळे मिळावे , व याचे बांधकामा करीता चिमूर नगर परीषदेस निधी उपलब्ध करूण देण्याची मागणीसाठी महसुलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचेशी डॉ .अविनाश वारजुरकर यांनी सविस्तर चर्चा केली .गाळे बांधकामाच्या निधी च्या आग्रही मागणीला महसुल मंत्र्यांनी अनुकुलता दर्शवली . चर्चे दरम्यान नगरसेवक विनोद ढाकुणकर यांचीही उपस्थिती होती .

+

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button