Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील व शहरांमधील महा-ई-सेवा केंद्र चालक जोमात पंढरपूर तहसीलदार कोमात..

पंढरपूर तालुक्यातील व शहरांमधील महा-ई-सेवा केंद्र चालक जोमात पंढरपूर तहसीलदार कोमात..

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरीच्या पावन नगरी मध्ये तहसील विभागाला तीन महिन्यांपूर्वी निदर्शनास आणून देऊनही कारवाई नाही
ग्रामीण भागातील लोकांच्या सोयीसाठी सरकारने दिलेल्या या सुविधेचा वापर केला जात आहे चक्क शहरात येऊन पैसे मिळविण्यासाठीच !
परवाना एका ठिकाणचा अन पासवर्ड वापरून पैसे लुटण्याचा धंदा केला जातो दुसऱ्याही अनेक ठिकाणी पंढरपूर। तालुक्यातील महसूल विभागाच्या दुर्लक्षपणाचा विविध क्षेत्राततील विविध लोक वेगवेगळ्या प्रकारे गैरफायदा घेत आहेत. ही बाब सर्वसामान्य लोकांना माहिती होऊनच गेलेली आहे, परंतु याच महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ टाकून पंढरपूर शहरातील अनेक लोकांनी तर आता सरकारलाही फाटा देऊन चक्क बेकायदेशीर महा इ सेवा केंद्रच बेकायदेशीरपणे चालवून केवळ सेवा सुविधा नाही तर पैसेच लुटण्याचा धंदा मांडला आहे. याबाबत मागील 6जुलै 2020 रोजी याबाबतीत असणाऱ्या सर्व बेकायदेशीर केंद्राची नावानिशी आणि पत्ता टाकून चौकशी करण्याबाबत लेखी अर्ज देऊनही याची कसलीही चौकशी आणि कारवाई करण्याचे धाडस येथील महसूल विभागाने केलेले नाही. त्यामुळे पंढरपूरचा पदभार पेलवेना अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.शासनाकडून ग्रामीण भागातील जनतेला कोणत्याही प्रकारचे दाखले काढण्यासाठी शहरात येऊन हेलपाटे मारायची वेळ येऊ नये म्हणून अनेक ग्रामीण भागात महा इ सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवाने देण्यात आले होते. परंतु या परवान्याची दुरुपयोग करीत चक्क पंढरपूर शहरात ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तर यामध्येच आणखी एक गैरफायदा घेत काहीजणांना शहरातील काही भागापूरता परवाना असतानाही एकाच परवान्याचा वापर इतर अनेक ठिकाणी या सुरू ठेवला आहे.अशाप्रकारे पंढरपूर शहरातील24 पेक्ष्या जास्त ठिकाणी बेकायदेशीर महा इ सेवा केंद्र सुरू आहेत.
ग्रामीण भागातून आलेल्या पंढरपूर शहरातील या बेकायदेशीर केंद्रावरून थेट पंढरपूर शहरातील दाखला कसा येऊ शकतो ही बाब दाखला तपासणी अधिकाऱ्याच्या लक्षात येऊन संबंधित व्यक्तीची चौकशी केल्यास हे बेकायदेशीर केंद्र चालकांवर कारवाई करण्यासाठी सबळ पुरावा होऊ शकतो. त्यामुळे असले धंदे आपोआप बंद होऊ शकतील.एकतर सध्या पंढरपूर महसूल विभागांतर्गत कोणत्याही प्रकारच्या धाडी टाकण्याचे धाडस केले जात नाही. उलट बाहेर गावाहून पथके येऊन कारवाई होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे महसूल विभागातील संबंधित अधिकारी यांना धाडी टाकण्याचे धाडस नाही, की या तालुक्याचा पदभारच पेलवत नाही याबाबत आता वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री स्थरावर चौकशी होऊन आता कारवाई न करणाऱ्या अधिकारी यांनाच पदमुक्त करावे अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयातील शासकीय सेवा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातच संग्राम केंद्र सुरु करण्यात आले आहे. मात्र यातील काही भागातीलऑपरेटर हे संग्रामकेंद्र अनधिकृत ठिकाणी चालवून अनधिकृत पैसे मिळवीत शासनाचा पगारही घेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयचा महसूल बुडत असल्याचे दिसत आहे.वरील प्रकारची तक्रार देऊन आज जवळपास तीन महिन्यापेक्षा जादा कालावधी होऊनही याकडे म
महसूल विभागाने अद्यापही लक्ष दिले नाही त्यामुळे हेच त्यासाठी खरे कारण आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button