Jamner

दिव्यांगत्वावर मात करत सावित्रीच्या लेकीने उमटविली आदर्श शिक्षक पुरस्कारवर मोहोर !

दिव्यांगत्वावर मात करत सावित्रीच्या लेकीने उमटविली आदर्श शिक्षक पुरस्कारवर मोहोर !

पहूरच्या ‘किर्ती ‘ ची पसरली ‘किर्ती ‘ !
उद्या शिक्षक दिनी होणार गौरव !

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील
पहूर ,शाळा हे आमुचे आनंद निधान , अर्पु तन – मन शाळेसाठी
शाळा मंदिरात विद्यार्थी देव , झिजऊ आमुचा जीव त्यांच्यासाठी … ‘
हे ब्रीद उराशी बाळगून आपल्या शारीरिक दिव्यांगत्वावर मात करीत पहूर – कसबे येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कीर्ती बाबुराव घोंगडे यांना जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला असून उद्या शिक्षक दिनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे .
पहूर कसबे येथील ज्या कन्या शाळेत त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशा झाला ,तिथेच ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या किर्ती घोंगडे या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देत आहेत .त्यांच्या कार्याची दखल जिल्हा परिषदेने घेतली असून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .

बालपण व शिक्षण
मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी येथे त्यांचा जन्म झाला . पहूर कसबे जिल्हा परिषद कन्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले . डी . एड . अभ्यासक्रम पूर्ण करून २००६ मध्ये त्या पहूर कसबे कन्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या . मनुष्य हा जन्म भर विद्यार्थी असतो , या उक्ती प्रमाणे त्यांनी आपल्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही . बी .एड तसेच शिक्षण शास्त्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली .

गच्ची वरची शाळा
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या कठीण काळात शाळा बंद असताना शासकीय नियमांचे पालन करत कीर्ती घोंगडे यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच शाळा भरविली . या शाळेचा टप्प्याटप्प्याने अनेक विद्यार्थिनींनी लाभ घेतला . त्यामुळे गोरगरीब विद्यार्थिनींचे शिक्षण निरंतर सुरू राहिले .

उपक्रम-
विविध उपक्रमांची जंत्रीच जणूकाही त्यांच्या मनात सातत्याने सुरू असते . लोकसहभागातून त्यांनी शाळेचा कायापालट केला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर करून गोरगरीब विद्यार्थिनींना त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत .गावाच्या सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा अमित ठसा उमटला असून या पुरस्कारामुळे पहूर गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे .सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button