रावेर विधानसभा मतदारसंघातून
रावेर प्रतिनिधी विलास ताठे
रावेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आघाडीचे उमेदवार म्हणून शिरीष चौधरी, हे दि. 3 ऑक्टोबर गुरूवारी सकाळीच 9.वाजता आठवडे बाजार पटांगणातून थेट रावेर तहसीलदार कार्यालयात शिरीष चौधरी, आपला उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात समर्थकांसह शक्ती प्रदर्शनातून आघाडीच्या प्रमुख नेते, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह, असंख्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. कवाडे गट व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या सामूहिक कार्यकर्ते समर्थक यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यापासूनच त्यांची प्रचार रणधुमाळीची रंगीत तालीम होणार आहे,
यामुळे परिसरातील नागरिक, तसेच सर्व आघाडीच्या कार्यकर्त्या ना त्यांनी आवाहन केले आहे, असे रावेर, यावल तालुक्यातील आघाडीचे सर्व तालुकाध्यक्ष यांनी संयुक्त रित्या जाहीर केले .







