AmalnerMaharashtra

?️ Big Breaking दिलासा दायक बातमी…अमळनेर चे 11 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

?️ Big Breaking दिलासा दायक बातमी

अमळनेर चे 11 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

अमळनेर

जळगाव येथील कोविड 19 रुग्णालयात घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रुग्णांपैकी 25 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहे. हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कुठे तरी दिलासा मिळाला आहे.

सदर अहवालात अमळनेर येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 11 व्यक्तींचा समावेश आहे.

जळगांव येथे कोविड रुग्णालयात काल रात्री उपचारादरम्यान अमळनेर येथील 66 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता सदर व्यक्तीचे शव अमळनेर मध्ये आणण्यास मनाई करण्यात आली आहे.कोरोना बाधित हा अमळनेर तालुक्यातील चौथा रुग्ण आहे ज्याचा मृत्यु झाला आहे.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 इतकी असून त्यापैकी पाच व्यक्तींचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती बरी होऊन घरी गेला आहे. यातील चार व्यक्ती अमळनेर तालुक्यातील आहेत.तर उर्वरित 12 रुग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

??अमळनेरचे 11 जण निगेटिव्ह

सध्या हाती आलेल्या माहिती नुसार 11 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

  • ग्रामीण रुग्णालयातील 5 कर्मचारी,
  • मुंगसे महिलेच्या संपर्कातील 2 ,
  • साळीवाड्यातील महिलेच्या संपर्कातील रिक्षावाले 2
  • अमलेश्वर नगर मधील मृत कोरोना पॉझिटिव्ह चा 1 नातू निगेटिव्ह
  • अमलेश्वर नगर मधील उपचारादरम्यान मेलेल्या रुग्णाच्या संपर्कातील दुसरा व्यक्ती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button