Chopda

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला विजेतेपद

तालुकास्तरीय  क्रिकेट स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला विजेतेपद 

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला विजेतेपद

     
चोपडा – प्रतिनिधी सचिन जयस्वाल
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव आणि चोपडा तालुका बहुविध क्रीडा परीषद यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आलेल्या शासकीय शालेय तालुकास्तरीय 17 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला घवघवीत यश मिळाले. व तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. आणि जळगाव जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चोपडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त केला.
सदर स्पर्धा पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या मैदानावर घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेत एकूण पाच संघानी सहभाग घेतला होता. अंतिम सामना पंकज विद्यालय चोपडा व पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल यांच्यात रंगलेला होता. त्यात पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला विजेतेपद व पंकज विद्यालयास उपविजेते पद मिळाले. स्कूलचे संस्थापक चेअरमन   डॉ. सुरेशपंडीत बोरोले व संस्थेचे संचालक पंकज बोरोले तसेच तालुका क्रीडा संयोजक  राजेंद्र अल्हाट सर व स्कूलचे प्राचार्य मिलिंद पाटील सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले. संघाचे क्रिकेट कोच रूपेश शेलके व वस्तिगृह प्रमुख श्री. के.पी.पाटील सर यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. परिसरात सर्वदूर खेळाडूंचे कौतुक होत आहे….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button