Indapur

एसटी महामंडळाच्या बस डेपोंचं रुपडं बदलणार – परीवहन मंत्री अनिल परब

एसटी महामंडळाच्या बस डेपोंचं रुपडं बदलणार
– परीवहन मंत्री अनिल परब

दत्ता पारेकर

विमानतळावर असतात अशा व्हिडिओ वॉल, सोयी सुविधा, असलेल्या जमिनीचा व्यापारी उपयोग, स्वच्छ टॉयलेट्स आणि पिण्याचे पाणी. हे चित्र लवकरच महाराष्ट्रातील 150 च्या आसपास असलेल्या बस डेपोंवर दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे बस डेपो अशाच पद्धतीने येत्या काही दिवसांमध्ये कात टाकणार आहेत.

याची सुरुवात हे नाशिक मधील त्रंबकेश्वर, अहमदनगर मधील कर्जत-जामखेड, आणि रत्नागिरीतील दापोली या तीन डेपोंमधून करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. डेपोंचे अत्याधुनिकीकरण करत असताना सर्व साधारणपणे एकाच स्टँडर्ड पॅटर्नमध्ये असतील अशी काळजी आम्ही घेऊ असे परब म्हणाले.

पहिल्या तीन डेपोंमध्ये त्र्यंबकेश्वर आणि दापोली यांच्या निवडीमागचे कारण हे आहे की ही दोन्ही ठिकाणं पर्यटन स्थळ आहेत. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा राबता असतो. नगर जिल्ह्यात असलेल्या कर्जत जामखेड चा डेपोचं अत्याधुनिकीकरण आणि असलेल्या एकूणच फॅसिलिटी यांच्या वृद्धीबाबत मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

या तीन डेपोंचे काम फेब्रुवारी महिन्यातच भूमिपूजन करून सुरुवात करण्यात येईल. अत्याधुनिक करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या 150 डेपोंची यादी आपण मागवली असून याच्यावरील काम नेमक्या कुठल्या मॉडेलवर करायचे आहे याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे परब म्हणाले.
डेपोमध्ये असलेल्या जमिनीचा व्यापारी उपयोग करण्यात येईल आणि डिजिटायझेशन च्या माध्यमातून लोकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न असेल. विमानतळावर असतात असे गाड्यांच्या वेळापत्रका सह व्हिडिओ वन या डेपोंमध्ये असतील आणि प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल.

परब म्हणाले की त्याच वेळेला महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवैध वाहतुकीवर पायबंद घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे आणि ती चालवायला एसटीला जे मारक आहे ते थांबवण्यात येईल असे परब म्हणाले.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात साधारणपणे 18,500 च्या आसपास गाड्या आहेत. यामध्ये लाल डब्यापासून एशियाड ते शिवशाही आणि शिवनेरी चा समावेश होतो. साधारणपणे 1.02 लाखाच्या आसपास कर्मचारीवृंद असलेली एसटी दिवसाला साधारणपणे 67 लाख प्रवाशांची वाहतूक करते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button