रमजानचा पवित्र सण लॉक डाऊन काळामध्ये शांततेने साजरा करावा — डॉ शितल के शहा
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरामधील लॉकडाऊन असल्यामुळे मुस्लिम बांधवांचा पवित्र असा सण रमजान सण हा हा सण मुस्लिम बांधव तसेच काही हिंदू बांधव हे रोजे उपवास करुन आपला ईश्वरावरील श्रद्धा व निष्ठा व्यक्त करण्यासाठी तसेच समाजामध्ये सुख-शांती कायम अबाधित रहावे म्हणून हा उपवास मुस्लिम बांधव करीत असतात सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरामध्ये तसेच आपल्या भारत देशात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने हैदोस घातलेला आहे हा कोरोना रोग संसर्गाने वाढत असल्यामुळे शासनाने दिलेले काही नियम अटी सोशल डिस्टन्स तसेच आपल्यात तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून समाजामधील वावर असावा जेणेकरून या कोरोनासंसर्गाचा फैलाव होणार नाही याची काळजी आपण सर्व मुस्लिम व हिंदू बांधवांनी घ्यायची आहे. मुस्लिम बांधवांनी रमजान सणाच्या काळामधील नमाज हा आपल्या घरामध्ये अदा करावी. आपल्या प्रार्थने मधून आपल्या देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील हा कोरोना संसर्ग असलेला हा रोग पूर्णता नष्ट व्हावा अशी प्रार्थना तमाम मुस्लिम बांधवांनी करावी असे आवाहान डॉक्टर शितल के शहा बाल रोग तज्ञ यांनी केले आहे.
पंढरपूर शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान महिन्याच्या कालावधीमध्ये आपली ईश्वरा विषयीची प्रार्थना नमाज हा घरीच पढला जात आहे. सोशल डिस्टन्स तसेच तोंडाला मास्क लावणे लोकसमूह टाळणे इत्यादी बाबतची खबरदारी मुस्लिम बांधव पंढरपूर येथे घेत आहेत ही आनंदाची बाब आहे असे डॉक्टर शितल के शहा यांनी व्यक्त केले त्यांनी रमजान सणाच्या निमित्ताने तमाम मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत






