प्रशांत परिचारक यांच्या गाडी वर काळीक टाकून माजी सैनिक बापू गायकवाड यांनी निषेध व्यक्त केला…!
प्रतिनिधी
विद्यमान विधानपरिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी मागील तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी सैनिकांच्या बद्दल काढलेल्या आक्षेपार्ह विधानाचा, अपशब्दाचा निषेध व्यक्त करत आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर काळे ऑइल फेकत जाहीर निषेध व्यक्त केला.
पंढरपूर तालुक्यातील एका जाहीर सभेमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांच्या बद्दल सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या भावना दुखावणारे विधान व्यक्त केले होते. त्याचा निषेध म्हणून जवळपास तीन ते साडेतीन वर्षे त्याची वाट पहात दि.९ नोव्हेंबर मंगळवार रोजी,सकाळी प्रशांत परिचारक बार्शीकडे जात असताना रिधोरे ता.माढा येथे माजी सैनिकांच्या वतीने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कट्टर शिलेदार तथा माजी सैनिक बापू भिमराव गायकवाड यांनी परिचारक यांची गाडी अडवून, भारत माता की जय, वंदे मातरम् अश्या घोषणा देत, त्यांच्या गाडीवर काळे ऑइल फेकत निषेध व्यक्त केला.
माझी सैनिक बापू गायकवाड माढा तालुक्यातील रिधोरे येथे येऊन जोपर्यंत तालुक्यातील सैनिकांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत माढा तालुक्यात कोठेही फिरू देणार नाही,वेळ आल्यास गाडीही फोडली जाईल.
आ.प्रशांत परिचारक यांच्यावर तीन ते साडेतीन वर्षांनंतर सुध्दा सैनिकांचा रोष अद्यापही आहे. असेच याप्रकाराने दिसत आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमलेली होती.






