Pandharpur

मनसेच्या वतीने  एसटी कर्मचाऱ्यांना सॅनिटाझर आणि मास्कचे वाटप*

मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सॅनिटाझर आणि मास्कचे वाटप

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर येथील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.येथील आगार व्यवस्थापक श्री. सुतार व व्यवस्थापक पंकज तोंडे यांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात चालक आणि वाहकांना सॅनिटायझरचे वाटप केले.मनसेच्या वतीने शहर व तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे मोठ्या प्रमाणात वाटप केले आहे. आज एसटीच्या चालक आणि वाहकांनाही याचे वाटप केले.

लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीय व राज्यातील लोकांना त्यांच्या गावी पोचवण्याचे काम सध्या एसटीच्या वतीने सुुरु आहे. पंढरपूर आगारातूनही काही एसटी बस पनवेलकडे रवाना झाल्या. त्यापूर्वी या एसटी बस चालक आणि वाहकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करुन त्यांना मदत केली.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके, अर्जून जाधव,समाधान डुबल आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button