Maharashtra

मिशन हम्म  काय आहे मिशन हम्म  हि मिशन एक मोठी देश सेवा आहे जी आपण घरी बसून करू शकता आपण आम्ही सांगितल्या .

मिशन हम्म काय आहे मिशन हम्म हि मिशन एक मोठी देश सेवा आहे जी आपण घरी बसून करू शकता आपण आम्ही सांगितल्या .

प्रतिनिधी राजेश सुनाने

प्रमाणे हि देश सेवा केल्यास आपल्या कुटुंबास डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे कुटुंबास डिजिटल प्रशस्ती पत्र देण्यात येईल . हि मिशन समाजातील सर्व स्त्री , पुरुष यांचे साठी खुली आहे. होम मास्क मेकिंग मिशन ( Hmmm) —- कोरोना आपले पाय आता गावागावात पसरवीत आहे. समाजामध्ये कधी कोरोना पसरून आपले घरात येईल हे सांगता येत नाही . मास्क घालणे शिवाय आता पर्याय नाही , कोरोना चा शिरकाव आपल्या शरीरात नाक , तोंड आणि डोळ्या द्वारे होऊ लागलाय . तेंव्हा आपण मास्क चा वापर करून स्वतःचा आणि कुटुंबीयांचा आणि सोबत १० समाज बांधवांचा बचाव करायचा संकल्प करायचंय. परंतु मास्क चा तुटवडा सुरूय. जिथे आहेत तिथे चढ्या दराने मास्क मिळताय म्हणून आपण घरीच मास्क बनवायचे जे वारंवार वापरता येतील. प्रत्येक कुटुंब ज्यांचे कडे शिलाई मशीन आहे त्यांनी या प्रकल्पा मध्ये सामील व्हायचे आहे. आपल्या घरातील स्वच्छ कापड ( शक्यतोवर कॉटन ) घ्यायचेय त्या पासून घरीच मास्क बनवायचाय . कृती खाली मी दिलीय . घरातील प्रत्येकासाठी एक मास्क आणि सोबत ज्यांचे घरी शिलाई मशीन नाही अश्या तुमच्या शेजाऱ्यांसाठी १० मास्क बनवायचेय. मास्क कमीत कमी २ पदरी असावा ( फिल्टर नीट होण्यासाठी हे आवश्यक आहे.
१) कृती मध्ये दिल्या प्रमाणे आपल्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसाठी १० मास्क बनवून घ्या. २) शक्यतोवर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रंगाचे मास्क बनवा . ( प्रत्येकाचा मास्क ओळखणे या मुले सोपे होईल) ३) कुटुंबातील सर्वानी मास्क घाला, शेजाऱ्यांसाठी बनविलेले १० मास्क हातात घ्या आणि एक सुंदर सेल्फी आपल्या मोबाइलला मध्ये काढा . ४) हि सेल्फी आणि तुमचे नाव , संपूर्ण पत्ता , मोबाइल नंबर सह ९५४५९३८९३८ या नंबर वर व्हाट्सअप करा . ५) आम्ही आपण दिलेल्या नावाने आपल्या कुटुंबीय साठी डिजिटल प्रशस्ती पत्र पाठवू ६) आपण केलेल्या देशसेवेची माहित समाज पर्यंत पोहचविण्यासाठी डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन चा संदर्भ देऊन फेसबुक , व्हाट्सअप, ट्विटर , इंस्टाग्राम वर सेल्फी सह प्रकाशित करा . यासाठी ची फ्रेम आम्ही आपणास देऊ . ६) आपला या संदर्भात कुठलाही कॉल घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी .
मास्क बनविण्याची कृती १) स्वच्छ धुतलेले कापड घ्या . २) मापानुसार आयता कृती तुकडे कापून घ्या. ३) एकावर एक असे २ तुकडे ठेवून ४ बाजूनी शिवून घ्या . ४) ४ बाजूनं पायपिंग लावा ( आपणास हवी असेल तर) ५) बांधण्यासाठी नाड्या शिवून घ्या ६) चित्रामध्ये दाखविलेल्या प्रमाणे ४ ठिकाणी नाड्या टाचून घ्या.
टीप – १) मास्क मुळे नाक आणि तोंड खाली हनुवटी पर्यंत झाकले जाणे आवश्यक आहे. २) लहान मुलांसाठी आवश्यकते नुसार कापड कापून मास्क बनवा.
मास्क रोज वापरताना घेण्याची काळजी १) मास्क रोज गरम पाण्यात डेटॉल किंवा साबणाने स्वच्छ धुवून घ्यावेत . २) एकमेकांचे मास्क वापरू नये . ३) बाहेरून आल्यावर मास्क काढताना आधी नाड्या सोडाव्या आणि मास्क गरम पाण्यात टाकावा. ४) मास्क सोडल्यावर हाथ साबणाने स्वच्छ धुतल्याशिवाय तोंडात बोटे टाकू नये, किंवा नाक , डोळे चोळू नये. आपली सुरक्षा आपल्या हातात . हम्म करू , कोरोनाला हरवू . आपला विजय निश्चित आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यत हि मोहीम पोहचवा . तुमच्या संपर्कातील प्रत्येकाला या मिशन मध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करा. स्वतः सुरक्षित राहा आणि इतराना सुरक्षित राहण्यासाठी मदत करा. धन्यवाद मनीषा ताई चौधरी नासिक विभाग समन्वयक डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button